मदतनीस प्राणी विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या लोकांना मदत करतात, त्यापैकी काहींचे अपंगत्व कदाचित दिसणार नाही. मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचे तुमच्या कारमध्ये स्वागत करणे आणि पुढील गोष्टी लक्षात ठेवणे:
1. मदतनीस प्राण्यांना त्यांच्या मालकाच्या आधी कारमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते आणि ज्या कामासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे ते करण्यासाठी ते त्यांच्या मालकाच्या जवळ बसू शकतात.
2. त्यांच्या कामात व्यत्यय येणे टाळण्यासाठी, तुम्ही कधीही प्राण्याला स्पर्श करू नये किंवा त्याच्याशी संवाद साधू नये.
3. प्राण्याला झोपण्यासाठी टॉवेल किंवा ब्लँकेट घेऊन जाण्याचा विचार करा. मदतनीस प्राण्यामुळे नुकसान किंवा अस्वच्छता झाल्यास तुम्ही मदतीसाठी तुमच्या Uber ड्रायव्हर ॲपमधील मदत टॅबद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता.