सर्वात जास्त रायडर्स कधी आणि कुठे असतात?

कधी

बऱ्याचशा शहरांमध्ये, आठवड्याच्या अखेरीस, गर्दीच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी राईड्सची मागणी सर्वाधिक असते.

तुम्ही तुमच्या आठवड्याचे नियोजन करण्यासाठी ताशी ट्रेंड्स वैशिष्ट्यासह तुमचे ड्रायव्हर ॲप वापरू शकता. आमच्या अंदाजानुसार तुमच्या शहरात सर्वात जास्त गर्दी केव्हा असेल याचा चार्ट पाहण्यासाठी, खालील पायऱ्यांचे पालन करा:

  1. तुमच्या ॲपच्या खाली डावीकडील कोपऱ्यात असलेल्या ॲरो चिन्हावर टॅप करा.
  2. "ताशीचे ट्रेंड्स पहा" निवडा.
  3. तुम्हाला ज्या भागात गाडी चालवायची आहे तो भाग स्पष्ट करण्यासाठी "यासाठी पहा" पर्यायापुढील शहराच्या नावावर टॅप करा.

तुम्ही ताशी चार्टखालील टाइम फ्रेमवर स्लाइडर हलवून व त्यानंतर "माझ्या दिवसामध्ये जोडा" वर टॅप करून ठराविक वेळांमध्येच गाडी चालवण्यासाठी रिमाइंडर्स सेट करू शकता.

कुठे

तुमच्या शहरातील वेगवेगळ्या भागांमधील मागणीची तुलना करण्यासाठी ड्रायव्हर ॲपमधील हीट मॅप वापरा. या नकाशावर राईड्सची कमी, अधिक आणि एकदम वाढती मागणी वेगवेगळ्या फिकट किंवा गडद रंगछटांनुसार दाखवली जाते.

तुम्ही नकाशावर झूम इन आणि झूम आउट केल्यावर, तुम्हाला भाडेवाढीच्या किमतींचा अंदाज गुणकांमध्ये दिसेल. उदाहरणार्थ, तुम्हाला 1.3x, 1.4x, किंवा 2.1x असे षट्कोन दिसतील.