drivers.uber.com वर कोणता डेटा उपलब्ध आहे?

drivers.uber.com वर, तुम्ही तुमच्या खात्याशी संबंधित माहिती पाहू शकता आणि व्यवस्थापित करू शकता, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे:

  • पेमेंट स्टेटमेंट्स
  • कर कागदपत्रे
  • बँकिंग माहिती

पेमेंट स्टेटमेंट्स

पेमेंट स्टेटमेंट्स टॅबमुळे तुम्हाला पेमेंट कालावधीनुसार तुमची स्टेटमेंट्स ॲक्सेस करता येतात.

पेमेंट स्टेटमेंट पाहण्यासाठी:

  1. drivers.uber.com मध्ये साइन इन करा.
  2. मुख्य मेनू उघडण्यासाठी मेनू चिन्हावर टॅप करा.
  3. "कमाई" आणि त्यानंतर "स्टेटमेंट्स" निवडा.
  4. योग्य स्टेटमेंट पाहण्यासाठी महिना आणि वर्ष निवडा.
  5. योग्य आठवड्यात, "स्टेटमेंट पहा" वर टॅप करा. स्टेटमेंट डाउनलोड करण्यासाठी, "सीएसव्ही डाउनलोड करा" बटणावर टॅप करा.

प्रत्येक स्टेटमेंटमध्ये हे समाविष्ट आहे:

  • त्या आठवड्यातील तुमची कमाई आणि शिल्लक
  • तुमच्या शिलकीचे विश्लेषण
  • आयटमनुसार रकमेच्या विश्लेषणासह त्या आठवड्यातील सर्व ट्रिप्स. विशिष्ट ट्रिपचा तपशील पाहण्यासाठी, ट्रिप आयडी कॉलममधील लिंक निवडा.

कर कागदपत्रे

तुमची कराशी संबंधित कागदपत्रे पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी कर माहिती टॅबवर जा. Uber तुम्हाला वार्षिक सारांश देते, जो तुम्ही तुमच्या नोंदींसाठी पीडीएफ म्हणून डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट करू शकता.

तुम्ही तुमची कराशी संबंधित माहिती कर सेटिंग्ज टॅबमध्ये अपडेट करू शकता.

बँकिंग माहिती

बँकिंग टॅब वापरून तुम्ही हे करू शकता:

  • प्रत्यक्ष त्यावेळी असलेली तुमची खाते शिल्लक आणि व्यवहाराचा इतिहास पाहणे
  • तुमच्या पेआउट पद्धती (जसे की लिंक केलेली बँक खाती व डेबिट कार्ड्स) आणि प्राधान्ये व्यवस्थापित करणे
  • Uber ला पेमेंट्स करणे

तुमच्या पेमेंट सुरक्षेसाठी संवेदनशील माहिती (जसे की तुमचा संपूर्ण बँक खाते क्रमांक) लपवून ठेवली जाते.