मी ऑनलाइन असताना इतर ॲप्स वापरू शकतो का किंवा खाजगी कॉल्स घेऊ शकतो का?

तुम्ही ऑनलाइन गेलात मात्र त्यानंतर रायडरच्या ट्रिप विनंतीचा स्वीकार न करताच दुसऱ्या ॲपवर स्विच केलेत तर, तुम्हाला विनंत्या मिळवायची इच्छा नसल्यास तुम्ही ऑफलाइन जावे असे सुचवणाऱ्या सूचना दर 3 मिनिटांनी तुमच्या स्क्रीनवर दाखवल्या जातील. तुम्ही ट्रिपवर असताना तुमचे ॲप तुम्हाला हे पॉप-अप्स पाठवणार नाही.

तुमचे Uber ॲप तुम्ही दुसरी ॲप्स वापरत असताना किंवा फोन वापरत असताना तसेच काम करत राहते. अचूक भाड्यासाठी तुमच्या ट्रिप्सची नोंद ठेवण्याकरता ही जीपीएस माहिती गोळा केली जाते.

फोनच्या वापराशी संबंधित स्थानिक नियमनांचे पालन करा. गाडी चालवत असताना फोनवर बोलणे हे लक्ष विचलित करणारे आणि धोकादायक ठरू शकते हे कृपया ध्यानात ठेवा. काही रायडर्सना हे उद्धटपणाचे आणि असुरक्षितदेखील वाटते.