रायडर मदतनीस प्राण्याबरोबर प्रवास करत आहे हे मला कसे कळेल?

मदतनीस प्राणी विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या लोकांना मदत करतात, त्यापैकी काहींचे अपंगत्व कदाचित दिसणार नाही. मदतनीस प्राण्याने टॅग घातला पाहिजे, त्याची नोंदणी केली असली पाहिजे किंवा तो मदतनीस प्राणी असल्याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा दाखवला पाहिजे अशी कोणतीही आवश्यकता नाही.

काही नियमनांनुसार रायडरचा प्राणी मदतनीस प्राणी आहे याची पुष्टी करण्यासाठी तुम्ही दोन प्रश्न विचारू शकता:

1. एखाद्या अपंगत्वामुळे हा प्राणी आवश्यक आहे का?
2. प्राण्याला कोणते काम किंवा कार्य करण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे?

रायडरने त्याचा प्राणी मदतनीस प्राणी आहे हे सिद्ध करणारे कागदपत्र सादर करावे, अशी विनंती तुम्ही करू शकत नाही.