मला खाणे मागवणारा सापडला नाही/खाणे मागवणाऱ्याला उशिर झाला

¨दाराशी ठेवा¨ अशी ऑर्डर आहे का ते तपासा. हे तपासण्यासाठी, ग्राहकाच्या नावाखाली ऑर्डरमध्ये “दाराशी ठेवा” असा पर्याय आहे का ते तपासा. अशा वेळेस, ग्राहकाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ऑर्डर दर्शवलेल्या ठिकाणी ठेवा आणि त्यावर "पूर्ण झाली" म्हणून खूण करा. ऑर्डर दाराशी ठेवली आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही ऑर्डरचा फोटो देखील ग्राहकांना पाठवू शकता.

ऑर्डर दाराशी ठेवायची नसल्यास आणि तुम्हाला ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अधिक माहिती हवी असल्यास, ग्राहकाशी फोनवर किंवा मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात चिन्ह दिसेल. ग्राहकाला किमान 2 वेळा फोनवर कॉल करण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना सलग 2 वेळा एसएमएस पाठवायचा प्रयत्न करा.

ग्राहकाने प्रतिसाद न दिल्यास, 7 मिनिटे प्रतीक्षा करा. जर तुम्ही तरीही ग्राहकाशी संपर्क साधण्यास असमर्थ ठरलात किंवा त्यांनी ऑर्डर नाकारली, तर तुमच्या ॲपमधील टायमर संपल्यानंतर तुम्ही ऑर्डर "डिलिव्हरी करण्यास असमर्थ" म्हणून चिन्हांकित करू शकता.

हा कालावधी 7 मिनिटांपर्यंत असू शकतो.

तुम्ही या स्टेप्सचे अनुसरण केल्यास तुम्हाला डिलिव्हरीसाठीचे पूर्ण पैसे दिले जातील याची कृपया खात्री बाळगा.

तुम्हाला आणखी मदत हवी असल्यास, तुम्ही ॲपद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता:

  • तुमच्या डिलिव्हरी स्क्रीनवर जा
  • स्क्रीनच्या तळाशी असलेल्या लाल त्रिकोणावर टॅप करा
  • 'सहाय्यकासोबत चॅट करा' निवडा’