अयोग्य वापर धोरण

ॲप्लिकेशनचा अयोग्य वापर होऊ नये यासाठी आमच्या ऑटोमॅटेड सिस्टिम्स सतत देखरेख करत असतात.

अयोग्य वापराच्या उदाहरणांमध्ये स्वतः रायडर म्हणून विनंती करणे, डुप्लिकेट खाती तयार करणे, ट्रिप्स पूर्ण करण्याचा उद्देश नसताना ट्रिप्स स्वीकारणे, खोटे शुल्क किंवा चार्जेसचा दावा करणे, ट्रिपच्या तपशीलांमध्ये फेरफार करणे किंवा अवैध रायडर्ससह ट्रिप्स जाणूनबुजून स्वीकारणे किंवा पूर्ण करणे समाविष्ट आहे.

कृपया लक्षात घ्या की ही ॲक्टिव्हिटी आमच्या प्रमोशन्सच्या अटींचे उल्लंघन करते. जर आमच्या सिस्टीमला तुमच्या खात्याशी संबंधित अयोग्य वापर आढळला, तर तुम्हाला प्रमोशन्सशी संबंधित रिवॉर्ड्स मिळणार नाहीत. ही ॲक्टिव्हिटी तुमच्या आमच्याशी असलेल्या कराराचा भंग मानली जाऊ शकते आणि परिणामी तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते.

तुम्हाला हा मेसेज मिळण्याबद्दल काही प्रश्न असतील, तर कृपया आम्हाला खाली कळवा.