2016 च्या डेटा सुरक्षाविषयक घटनेविषयी माहिती

ऑक्टोबर 2016 मध्ये Uber ला अशा एका डेटा सुरक्षाविषयक घटनेचा अनुभव आला जिच्यामुळे रायडर आणि ड्रायव्हर खात्यांशी संबंधित माहितीचे उल्लंघन झाले होते.

ड्रायव्हर्ससाठी, या माहितीत जगभरातील खात्यांशी सबंधित असलेली नावे, ईमेल पत्ते आणि मोबाईल फोन नंबर समाविष्ट होते. याव्यतिरिक्त, युनायटेड स्टेट्समधील सुमारे 600,000 ड्रायव्हर्सचे ड्रायव्हिंग लायसन्स नंबर डाउनलोड केले गेले. आमच्या बाहेरील फॉरेन्सिक तज्ज्ञांना ट्रिप लोकेशनचा इतिहास, क्रेडिट कार्ड क्रमांक, बॅंक खाते क्रमांक किंवा जन्मतारखा डाउनलोड केल्या गेल्याचे कोणतेही संकेत आढळले नाहीत.

युनायटेड स्टेट्समध्ये या घटनेत अंदाजे 2.56 कोटी रायडर्स आणि ड्रायव्हर्सचा समावेश होता. या संख्या म्हणजे अचूक आणि निश्चित आकडे नसून एक अंदाज आहे कारण काहीवेळा देश कोड नियुक्त करण्यासाठी आम्ही ॲपद्वारे किंवा आमच्या वेबसाइटद्वारे आम्हाला मिळणारी जी माहिती वापरतो ती एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वास्तव्याच्या देशाच्या माहितीपेक्षा वेगळी असते.

हे घडल्यानंतर आम्ही डेटा सुरक्षित करण्‍यासाठी तात्काळ पावले उचलली, पुढील कोणताही अनधिकृत ॲक्सेस बंद केला आणि आमची डेटा सुरक्षितता आणखी मजबूत केली.

आम्ही प्रभावित ड्रायव्हर्सना मेल किंवा ईमेलद्वारे थेट सूचित करत आहोत आणि त्यांना विनामूल्य क्रेडिट मॉनिटरिंग आणि ओळख चोरीपासून संरक्षण देत आहोत.

नोव्हेंबर 2016 मध्ये जेव्हा आम्हाला या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही हानी टाळण्यासाठी आणि रोखण्यासाठी पावले उचलली, परंतु आम्ही ड्रायव्हर्सना हे सांगितले नाही. आम्हाला वाटते की हे चुकीचे होते, म्हणूनच आम्ही वर्णन केलेल्या कृती आता करत आहोत. या घटनेशी संबंधित अशी कोणतीही फसवणूक किंवा गैरवापर घडून आल्याचा पुरावा आम्हाला सापडलेला नाही.

आम्ही प्रभावित ड्रायव्हर्सना सूचना पाठवण्याच्या प्रक्रियेत आहोत, परंतु डाउनलोड केलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांकांच्या खात्यांमध्ये तुमचे खाते समाविष्ट होते का हे तुम्ही खाली संपर्क साधून तपासू शकता.