ग्रॅबला Uber च्या विक्रीबद्दल ड्रायव्हर भागीदारांसाठी माहिती

आम्हाला तुमच्यासह एक बातमी शेअर करायची आहे - म्यानमारमध्ये राईडशेअरिंगच्या पुढच्या टप्प्यावर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी Uber आपले कार्य ग्रॅबसह एकत्र करणार आहे.

तुमच्यासाठी याचा काय अर्थ होतो : आम्ही 8 एप्रिल 2018 पर्यंत आमच्या सेवा ग्रॅब प्लॅटफॉर्मवर हस्तांतरित करू आणि त्या तारखेनंतर राईड स्वीकारण्यासाठी तुम्हाला ग्रॅब सेवेसाठी साइन अप करावे लागेल. खात्री बाळगा, अंतिम तारखेपूर्वी Uber प्लॅटफॉर्मवर पिकअप केलेल्या सर्व राईड्सचे पूर्ण पेमेंट केले जाईल.

तुम्ही काय केले पाहिजे:
ग्रॅब ड्रायव्हर ॲप येथे डाउनलोड करा (आयओएस - https://grb.to/iosdriver
अँड्रॉइड - https://grb.to/adrdriver)
विशिष्ट साइन-अप सूचनांसाठी grab.com/mm/comingtogether-driverpartner ला भेट द्या

या हस्तांतराबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया grab.com/mm/comingtogether-driverpartner ला भेट द्या. या बदलासाठी ग्रीनलाइट हब्ज, सोमवार 26 मार्च 2018 रोजी बंद राहतील.

धन्यवाद आणि आम्ही ग्रॅबमध्ये तुमच्यासह भागीदारी सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत.

नेहमीचे प्रश्न

काय बदलत आहे?
म्यानमारमध्ये राईडशेअरिंगच्या पुढच्या टप्प्यावर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी Uber आपली कामे ग्रॅबमध्ये विलीन करणार आहे. एकदा हस्तांतरण झाले की, तुमचे सर्व संवाद थेट ग्रॅबद्वारे व्यवस्थापित केले जातील.

हा बदल कधी होईल अशी मी अपेक्षा करू शकतो? त्या तारखेपर्यंत काय होईल?
अधिकृत हस्तांतरण 8 एप्रिल 2018 रोजी होईल; तोपर्यंत तुम्ही आधी करत होतात त्याप्रमाणेच Uber भागीदार ॲप वापरून प्रवाशांना पिकअप करू शकता. तथापि आम्ही शक्य तितक्या लवकर ग्रॅब ड्रायव्हर ॲपवर साइन अप प्रक्रिया करा असे सुचवतो. सुरू करण्यासाठी grab.com/mm/comingtogether-driverpartner वर जा.

हस्तांतरानंतरही मी माझे Uber भागीदार ॲप वापरू शकेन का?
नाही, हस्तांतरण तारखेनंतर तुम्ही Uber भागीदार ॲप वापरून प्रवाशांना पिकअप करू शकणार नाही.
तथापि, तुमचे भागीदार ॲप तुमची खाते माहिती, मागील कमाई आणि मागील ट्रिप्स प्रदर्शित करणे सुरू ठेवेल.

मी Uber ॲपवर स्वीकारलेल्या सर्व राईड्ससाठी मला पैसे मिळतील का? कधी?
होय, हस्तांतराच्या तारखेपूर्वी Uber भागीदार ॲप वापरून पिकअप केलेल्या सर्व राईड्सचे नियमित पेमेंट शेड्युलनुसार पूर्ण पैसे दिले जातील.

मला हस्तांतरण तारखेनंतर माझा Uber व्यवहार इतिहास ॲक्सेस करता येईल का?
होय, तुम्ही तुमच्या Uber भागीदार ॲपमध्ये लॉग इन करून किंवा uber.com वर जाऊन तुमचा संपूर्ण व्यवहार इतिहास कधीही पाहू शकता.

माझी माहिती ग्रॅबसह शेअर केली जाईल का?
तुमच्यासाठी गोष्टी सुलभ करण्यासाठी, तुम्ही आधी Uber सह शेअर केलेला सर्व डेटा आणि माहिती ग्रॅबला हस्तांतरित केली जाईल.

मी ड्रायव्हर म्हणून काम कसे सुरू ठेवू?
ग्रॅब ड्रायव्हर ॲप डाउनलोड करा [आयओएस - https://grb.to/iosdriver
अँड्रॉइड - https://grb.to/adrdriver]
तुमच्या विशिष्ट देशासाठी साइन-अप तपशीलांसाठी grab.com/mm/comingtogether-driverpartner तपासा
ग्रॅब प्लॅटफॉर्मवर आधीच नोंदणीकृत आणि सक्रिय असलेल्या ड्रायव्हर्ससाठी कोणताही बदल नाही

मी अद्याप Uber वर सक्रिय नसलो तर?
ग्रॅब खाते तयार करण्यासाठी कृपया grab.com/mm/comingtogether-driverpartner वर जा. आजपासून आम्ही यापुढे ड्रायव्हर्स सक्रिय करणार नाही.

मला आणखी प्रश्न असल्यास काय?
तुम्ही तुमच्या Uber ॲपच्या "मदत" विभागात किंवा help.uber.com वर Uber सहाय्याशी संपर्क सुरू ठेवू शकता.
ग्रॅबसह गाडी चालवण्याकरता साइन अप करणे, ग्रॅब ॲपवर सुरू केलेली ट्रिप किंवा ग्रॅबशी संबंधित कोणत्याही समस्येवरील प्रश्नांसाठी, तुम्ही grab.com/help शी संपर्क साधू शकता.