रेटिंग्ज कशी सुधारावीत

ट्रिपदरम्यानच्या काही घटनांचा अंदाज लावता येत नाही. तुमच्या नियंत्रणाच्या बाहेरील परिस्थितींचा तुम्हाला रायडरकडून मिळणाऱ्या रेटिंगवर परिणाम होऊ शकतो.

हे चिंतेचे कारण होऊ शकते हे आम्ही जाणतो. तुमचे एकूण रेटिंग हे तुमच्या सर्वात अलीकडच्या 500 पर्यंतच्या ट्रिप्सच्या सरासरीवर आधारित असल्यामुळे एखाद्या विशिष्ट ट्रिपचे रेटिंग तुमच्या एकूण रेटिंगवर फारसा परिणाम करणार नाही.

त्याचबरोबर, एखाद्या रायडरने नकारात्मक रेटिंग दिल्यास आणि तुमच्या कार्यक्षमतेशी संबंधित नसलेले कारण निवडल्यास (उदाहरणार्थ: खूपच जास्त पिकअप्स, किंमत, ॲप) ती ट्रिप तुमच्या एकूण रेटिंगच्या दृष्टीने मोजली जाणार नाही.

5-स्टार ड्रायव्हर्सकडून टिप्स

फाईव्ह-स्टार ड्रायव्हर्स सांगतात की रायडर्सना खरोखर आवडते, जेव्हा ते:

  • वाहने स्वच्छ, नीटनेटकी आणि दुर्गंध-मुक्त ठेवतात
  • रायडर्सना अंतिम ठिकाणापर्यंतच्या त्यांच्या पसंतीच्या मार्गाबद्दल विचारतात
  • संवाद नम्र, व्यावसायिक आणि आदरपूर्वक ठेवतात
  • व्यावसायिकदृष्ट्या साजेसे कपडे घालतात
  • रायडर्ससाठी वाहनाचे दरवाजे उघडतात
  • बाटलीबंद पाणी, नाश्त्याचे पदार्थ, गम, पेपरमिंट गोळ्या आणि सेल फोन चार्जर्स उपलब्ध ठेवतात
  • सुरक्षित असेल तेव्हा सामान आणि बॅगा उचलण्यास मदत करतात

तुमच्या साप्ताहिक आढाव्यात रायडर्सकडून मिळालेली रेटिंग्ज आणि टिप्पण्या दिसून येतात. यातून तुम्ही देत असलेल्या ट्रिपच्या अनुभवांबद्दल सखोल माहिती मिळते.