अपलोड केलेल्या कागदपत्रांचा आढावा घेण्यासाठी साधारणपणे 1-5 दिवस लागतात. अर्ज प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी, कागदपत्रे अपलोड करताना कृपया ह्या टिप्स लक्षात ठेवा:
- सर्व कागदपत्रे अद्ययावत आहेत आणि कालबाह्य झालेली नाहीत याची खात्री करा. मुदत संपलेली कागदपत्रे नाकारली जातील आणि ती पुन्हा सबमिट करावी लागणार असल्याने, तुमचा प्रतीक्षा कालावधी वाढेल.
- वाहन विमा पुराव्यावर आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या कागदपत्रांवर तुमचे नाव स्पष्टपणे दिसले पाहिजे. या कागदपत्रांवरील तुमचे नाव तुम्ही तुमच्या Uber खात्यात साइन अप करण्यासाठी वापरत असलेल्या नावाशी जुळले पाहिजे.
- अपलोड केलेले फोटो स्पष्ट आणि सुवाच्य असल्याची खात्री करा. कागदपत्रांचे फोटो काढताना कॅमेऱ्याचा फ्लॅश वापरणे टाळा. फ्लॅशमुळे फोटोवर चमक येते व त्यामुळे आवश्यक माहिती अस्पष्ट होते.
- अपलोड केलेल्या फोटोंमध्ये कागदपत्रांचे सर्व 4 कोपरे दिसत आहेत ना हे तपासा.