तुमचे Uber खाते सुरक्षित ठेवणे

फिशिंग म्हणजे काय?

फिशिंग म्हणजे तुमच्याकडून तुमची खाते माहिती (ईमेल, फोन नंबर आणि/किंवा पासवर्ड) चलाखीने काढून घेण्याचा प्रयत्न. फिशिंग प्रयत्न यशस्वी झाल्यास ओळख चोरी आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.

फिशिंग एका अवांछित कॉलच्या रुपात घडू शकते, ज्यात कॉलवरून तुमच्या खात्याची माहिती विचारली जाते. तसेच ते मेसेज किंवा ईमेलद्वारे देखील घडू शकते आणि त्यात बनावट लॉगिन पेजकडे घेऊन जाणारे अटॅचमेंट किंवा लिंक समाविष्ट असू शकते.

सामान्यपणे होणारे फिशिंग घोटाळे

  • तुमचा पासवर्ड आणि खाते माहिती विचारण्यासाठी तुम्हाला बनावट “Uber सहाय्य” कॉल किंवा मेसेज येणे
  • वैयक्तिक माहितीच्या बदल्यात Uber क्रेडिट्स ऑफर करणे
  • खाते माहितीची मागणी करणारे अवांछित कॉल्स किंवा बनावट लॉगिन पेजकडे नेणारे टेक्स्ट मेसेजेस आणि ईमेल लिंक्स.
  • सवलतीत उत्पादने विकणाऱ्या वेबसाइट्स ज्या तुम्हाला Uber खात्यात लॉगिन करायला सांगतात
  • तुम्हाला तुमच्या खात्यात गॅस गिफ्ट कार्ड जोडण्यास सांगणारे ईमेल्स किंवा कॉल्स जेणेकरुन ते तुमची कमाई बनावट डेबिट कार्ड्समध्ये कॅश आऊट करू शकतील

तुमचे खाते कसे सुरक्षित ठेवावे

कोणत्याही कारणास्तव तुमचा पासवर्ड कोणाशीही शेअर न करून तुम्ही तुमचे Uber खाते फिशिंगपासून सुरक्षित ठेवू शकता. आम्ही तुमचा पासवर्ड, एसएमएस कोड, बँकिंग माहिती किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड माहिती फोनवर किंवा ईमेलद्वारे कधीही विचारत नाही.

फिशिंग वेबसाइट्स Uber च्या कायदेशीर वेबसाइट्सची नक्कल करण्यासाठी डिझाइन केल्या असून त्यामध्ये Uber सारखे दिसणारे बनावट लॉगिन पोर्टल्स असू शकतात. त्या कारणास्तव, कोणत्याही वेबसाइटवर तुमचा Uber पासवर्ड टाकण्यापूर्वी तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमधील URL https://uber.com किंवा https://auth.uber.com/ दाखवत असल्याची खात्री करणे ही सर्वोत्तम पद्धत आहे.

तुमचे खाते संरक्षित करण्याचे 3 मार्ग

  • ईमेलवर किंवा आलेल्या फोन कॉलवर पासवर्ड्स, मिळालेले कोड्स किंवा तुमचा सामाजिक सुरक्षा क्रमांक कधीही शेअर करू नका.
  • बनावट Uber वेबसाइट्स टाळा. खऱ्या Uber वेबसाइटच्या URL मध्ये नेहमी “uber.com” असते.
  • ट्रिपदरम्यान रायडर्सना तुमचे डिव्हाइस वापरू देणे किंवा त्याचा ॲक्सेस देणे टाळा