नकाशातील भाग रंगांनी छायांकित का केले आहेत?

तुमच्या ॲपच्या नकाशामध्ये शहरातील विशिष्ट‍ भाग पिवळ्या, केशरी आणि लाल रंगाने दाखवले गेले आहेत. हे रंग राईड्ससाठी सध्या जास्त मागणी असलेले भाग दाखवतात.

जवळपासच्या राईडच्या विनंत्या मिळवण्यासाठी मागणीत वाढ असलेल्या भागांमध्ये जाऊन तुमच्या फायद्यासाठी या माहितीचा वापर करा. जे ड्रायव्हर्स रंगीत भागात पिकअपची विनंती करतात त्यांनी ट्रिपच्या भाड्यांसाठी भाड्यातील वाढीच्या किमतीला सहमती दिलेली आहे.

त्यांच्या सध्याच्या भाड्यातील वाढीचे गुणक आकड्यांमध्ये दिलेले पाहण्यासाठी तुम्ही नकाशावरील छायांकित भाग झूम इन करून वाढवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही 1.3x, 1.5x किंवा 2.2x असे भाड्यातील वाढीचे गुणक असलेले छायांकित भाग पाहू शकता.