तुम्ही तुमच्या रायडरची राईड विनंती स्वीकारल्यानंतर त्यांच्याशी ॲपद्वारे कॉल किंवा मेसेज करून संपर्क साधू शकता. आंतरराष्ट्रीय रोमिंग दर टाळण्यासाठी आम्ही ॲपमधील मेसेज सेवा वापरण्याची शिफारस करतो.
तुमच्या रायडरला तुम्ही मेसेज पाठवल्याची सूचना प्राप्त होईल. तुमच्या रायडरने प्रतिसाद दिल्यास, तुम्हालादेखील पुश सूचना मिळेल आणि एक इनकमिंग मेसेज दिसेल. हा मेसेज मोठ्याने वाचला जाईल आणि तो मिळाल्याची पोच म्हणून तुम्हाला प्रतिसाद म्हणून "थम्स-अप" पाठवू शकता.
आमच्या ॲपमधील वैशिष्ट्याद्वारे मेसेज पाठवल्यास, तुमची वैयक्तिक माहिती नेहमी सुरक्षित राहते. ट्रिप संपल्यानंतर तुमचा रायडर तुमची वैयक्तिक माहिती ॲक्सेस करू शकणार नाही.
जिथे उपलब्ध असेल तिथे, ॲप प्रत्येकाची माहिती खाजगी ठेवण्यासाठी रायडरचा नंबर आणि तुमचा नंबर दोन्ही निनावी ठेवते. हे निनावी नंबर्स नेहमी बदलत असल्याने, ते स्पीड डायलसाठी सेव्ह केले जाऊ शकत नाहीत.