लांबच्या ट्रिप्स स्वीकारणे

तुम्ही तुमच्या सध्याच्या लोकेशनपासून जितके अंतर गाडी चालवू इच्छिता त्यापेक्षा लांब असलेल्या अंतिम ठिकाणाची राईड विनंती तुम्हाला कधीकधी मिळू शकते. तुम्हाला अशी एखादी विनंती पाठवली गेल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या तळाशी "लांब ट्रिप" आणि ट्रिपची अंदाजे वेळ दिसेल.

तुम्ही जितक्या अंतरासाठी गाडी चालवण्यास इच्छुक आहात त्यापेक्षा लांबची विनंती प्राप्त झाल्यास ती स्वीकारू नका. ती विनंती आपोआप जवळच्या दुसऱ्या ड्रायव्हरला पाठवली जाईल. तुम्ही ती विनंती चुकून स्वीकारल्यास, कृपया ट्रिप रद्द करा.

टीप: काही ट्रिप्स काही तासांनंतर आपोआप समाप्त होऊ शकतात. हे होण्याआधी तुम्हाला सूचित केले जाईल आणि तुमचा रायडर ट्रिप पुढे सुरू ठेवू इच्छित असल्यास तो नवीन राईडची विनंती करू शकतो. जेव्हा तुम्हाला यापैकी एक सूचना मिळेल तेव्हा ट्रिप समाप्त होणार आहे हे तुम्ही रायडरला सांगावे, अशी आम्ही शिफारस करतो.