मल्टी रेस्टॉरंट बॅच ट्रिप्स - नेहमीचे प्रश्न

मल्टी-रेस्टॉरंट बॅच ट्रिप्स म्हणजे काय?

ऑर्डर्सची वाट पाहण्यात कमी वेळ घालवून खाद्यपदार्थ डिलिव्हर करण्यास जास्त वेळ देता यावा याकरता मल्टी-रेस्टॉरंट बॅच ट्रिप्स तुम्हाला मदत करतात.

बॅच ट्रिप्स कशा कार्य करतात:

  • तुमच्या पहिल्या ऑर्डरच्या पिकअप दरम्यान, जवळपासच्या रेस्टॉरंटची आणखी एखादी ऑर्डर पिकअपच्या प्रतीक्षेत असल्यास, तुम्हाला तुमची पुढील ऑर्डर स्वीकारण्यासाठी सूचना मिळेल
  • दुसरी ऑर्डर स्वीकारल्यानंतर, तुम्हाला त्या रेस्टॉरंट लोकेशनकडे पिकअपसाठी निर्देशित केले जाईल
  • दोन्ही ऑर्डर्ससाठीच्या आयटम्सची पडताळणी केल्यानंतर तुम्ही तुमची पहिली डिलिव्हरी ड्रॉप ऑफ कराल
  • तुम्ही तुमची पहिली डिलिव्हरी पूर्ण केल्यानंतर, बॅच ट्रिप्स संपवण्यासाठी तुमची दुसरी डिलिव्हरी पूर्ण करा

मी बॅच ट्रिप्स नाकारू शकतो का?

होय. तुम्ही बॅच डिलिव्हरीजसह कोणत्याही डिलिव्हरी विनंत्या स्वीकारू किंवा नाकारू शकता.

बॅच ऑर्डर्ससाठी माझी डिलिव्हरी फी कशी मोजली जाईल?

बॅच ऑर्डर्ससाठी, तुमची डिलिव्हरी फी खालीलप्रमाणे मोजली जाईल: 1. ठराविक पिकअप शुल्क + 2. प्रति रेस्टॉरंट (प्रत्येक अतिरिक्त रेस्टॉरंटसाठी 0.45X ठराविक पिकअप शुल्क अतिरिक्त मिळवा) प्रति मैल (किलोमीटर) दराने एक पिकअप शुल्क गुणक लागू केले जाईल + - प्रति मैल (किलोमीटर) भाडे गुणिले पिकअप लोकेशन्स आणि ड्रॉप ऑफ पॉईंट्स दरम्यानचे अंतर यानुसार मोजले जाते - ही गणना प्रवास केलेल्या प्रत्यक्ष मैलांवर (किलोमीटर) नव्हे तर सर्वात कार्यक्षम मार्गावर आधारित असू शकेल 3. तुम्हाला शहरानुसार प्रति मिनिट दर मिळू शकतो + - पहिल्या रेस्टॉरंटला पोहोचल्यापासून ते अंतिम ड्रॉप ऑफपर्यंत घालवलेल्या वेळेच्या आधारे मोजला जातो - ही गणना पिकअप्ससाठी अपेक्षित प्रतीक्षा वेळ, पहिले रेस्टॉरंट ते अंतिम ड्रॉपऑफ दरम्यान अपेक्षित प्रवासाचा कालावधी आणि ड्रॉपऑफच्या ठिकाणी अपेक्षित प्रतीक्षा वेळ (प्रत्यक्ष वेळेवर नाही), यांसह अंदाजे वेळेवर आधारित असू शकते - टीप: वेळेचे भाडे फक्त निवडक शहरांमध्ये लागू होऊ शकते. कृपया तुमच्या शहरातील डिलिव्हरी फीमध्ये वेळ-आधारित घटक असल्यास अधिक माहितीसाठी uber.com वर तुमच्या शहराची वेबसाइट पहा. 4. ठराविक ड्रॉप ऑफ शुल्क - तुम्ही ग्राहकांकडे ड्रॉप ऑफ केलेल्या प्रत्येक ऑर्डरसाठी ठराविक ड्रॉप ऑफ शुल्क मिळवा

कृपया तुमच्या शहरासाठी लागू असलेल्या अचूक दरांसाठी Uber.com वर तुमच्या शहराची वेबसाइट पहा.

उदाहरणार्थ, समजा तुम्ही दोन वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधून दोन ऑर्डर्स पिकअप केल्या. ठराविक पिकअप शुल्क $1.50 आहे. तसेच, प्रति मैल शुल्क $0.60 आहे, वेळेचे भाडे प्रति मिनिट $0.15 आहे आणि तुम्ही या ट्रिपसाठी 12 मिनिटे घालवली आहेत आणि एका ड्रॉप ऑफचे शुल्क $1.00 आहे (तुम्ही दोन वेगवेगळ्या ऑर्डर्स ड्रॉप ऑफ करत असल्यामुळे याला दोनने गुणा). त्यामुळे, ते इतके होईल: - पिकअप शुल्क = $1.50 - अतिरिक्त पिकअप शुल्क = (0.45$1.50) = $0.68 - प्रति मैल (किलोमीटर) भाडे = $0.60 - वेळेचे भाडे = (12$0.15) = $1.80 (तुमच्या शहरात लागू असल्यास) - ड्रॉपऑफ शुल्क = (2*$1.00) = $2.00 एकूण पेमेंट = $1.50+$0.68+$0.60+$1.80+$2.00 = $6.58

मला माझा पहिला ग्राहक न सापडल्यास आणि त्यामुळे माझ्या दुसऱ्या ऑर्डरसाठी मला उशीर झाल्यास मी काय करावे?

तुम्हाला डिलिव्हरी करताना ग्राहक सापडत नसल्यास, तुम्ही त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करू शकता. जर त्यांनी उत्तर दिले नाही तर, त्यांनी उत्तर दिले नाही हे दाखवणाऱ्या बॅनरवर तुम्ही टॅप करू शकता. यामुळे त्यांना सूचना पाठवली जाईल आणि टायमर सुरू होईल.

काउंटडाउन संपेपर्यंत त्यांनी तुमच्याशी संपर्क न साधल्यास आणि तुम्ही डिलिव्हरी समाप्त करण्याच्या सूचनांचे पालन केल्यास, तुम्हाला पहिल्या डिलिव्हरीसाठीसुद्धा पैसे दिले जातील आणि त्याचा तुमच्या रद्द करण्याच्या रेटिंगवर परिणाम होणार नाही. त्यानंतर तुम्ही तुमची दुसरी डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी जाऊ शकता.

मी बॅच ट्रिप्स विनंत्या प्राप्त करण्याची निवड पूर्णपणे रद्द करू शकतो का?

नाही, बॅच ट्रिप्स विनंत्या प्राप्त करण्याची निवड पूर्णपणे रद्द करण्याचा पर्याय सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र, तुम्ही बॅच ट्रिप्ससह कोणतीही ट्रिपची विनंती स्वीकारण्यास नकार देऊ शकता.