तुमच्या ॲपवर नेटवर्क संबंधित त्रुटी मेसेज दिसत असल्यास, हे करून पाहा:
1. सेटिंग्ज > वाय-फाय मधून वाय-फाय बंद करा.
2. सेटिंग्ज > एयरप्लेन मोड मधून एयरप्लेन मोड बंद करा.
3. सेटिंग्ज > सेल्युलर > सेल्युलर डेटा मधून सेल्युलर डेटा सुरू करा.
4. सेल्युलर डेटा > यासाठी सेल्युलर डेटा वापरा यामध्ये, Uber भागीदार ॲप सुरू केलेले आहे का ते तपासा.
या पायऱ्या पूर्ण केल्यावर, पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला अजूनही नेटवर्क त्रुटी मेसेज येत असल्यास तुम्ही येथे जाऊ शकता सेटिंग्ज > सामान्य > रीसेट > नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा. लक्षात घ्या, हे केल्याने तुमच्या फोनमधील सर्व स्टोअर केलेले पासवर्ड्स डिलीट केले जाऊ शकतात.