माझ्या पेमेंट स्टेटमेंटमध्ये एक ट्रिप गहाळ आहे

पेमेंट स्टेटमेंट्समध्ये तुमच्या साप्ताहिक पेमेंट सायकलमधील सर्व ट्रिप्सचा समावेश होतो. ही सायकल स्थानिक वेळेनुसार सोमवारी पहाटे 4 वाजता सुरू होते आणि पुढील सोमवारी पहाटे 4 वाजता संपते. एखादी ट्रिप सोमवारी पहाटे 4 नंतर पूर्ण झालेली असल्यास ती तुमच्या पुढील साप्ताहिक स्टेटमेंटमध्ये दिसू शकेल.

तुम्ही आठवड्याच्यामध्ये सुरू असलेले किंवा सध्याचे पेमेंट स्टेटमेंट पाहत असल्यास हे लक्षात असू द्या की पूर्ण केलेल्या ट्रिप्सवर प्रक्रिया होण्यासाठी काही वेळा 48 तास लागू शकतात.

48 तासांच्या प्रक्रिया कालावधीनंतरही तुम्हाला तुमच्या पूर्ण झालेल्या पेमेंट स्टेटमेंटमध्ये एखादी ट्रिप सापडत नसल्यास आणि ती ट्रिप तुम्ही आढावा घेत असलेल्या साप्ताहिक सायकलमध्येच असल्याची खात्री केलीे असल्यास कृपया या फॉर्मद्वारे आम्हाला कळवा.

अधिक भाडे असलेल्या ट्रिप्सचा आढावा घेण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.