गाडी चालवण्यासाठी ऑनलाइन जाऊ शकत नाही

आधी, तुम्ही योग्य ठिकाणी असल्याची पुष्टी करूया.

गाडी चालविण्यासाठी तुम्ही ऑनलाइन जाऊ शकत नसल्यास, कृपया खाली दिलेली ह्यासाठीची सामान्य कारणे तपासा.

नेटवर्क कनेक्टिव्हिटी

तुम्ही मर्यादित सेल्युलर नेटवर्क कव्हरेज असलेल्या किंवा ते उपलब्ध नसलेल्या क्षेत्रात असू शकता. अधिक चांगले कव्हरेज असलेल्या वेगळ्या लोकेशनवर जाण्याचा प्रयत्न करा.

जुनी ॲप आवृत्ती किंवा डिव्हाइस ऑपरेटिंग सिस्टीम वापरणे

बऱ्याचदा ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केल्यास या समस्येचे निराकरण होते.

खाते मर्यादा

सामान्य कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:

  1. तुम्ही तुमच्या साइन अप शहराच्या सेवा क्षेत्राबाहेर गाडी चालवत आहात. तुम्हाला नवीन शहरात गाडी चालवायची आहे का?
  2. तुमचे रेटिंग खूपच कमी आहे. तुम्ही तुमच्या रेटिंग्जमध्ये सुधारणा कशी करू शकता ते जाणून घ्या.
  3. तुम्ही युएस आणि कॅनडामध्ये गाडी चालवत असल्यास, तुम्ही तुमच्या लोकेशनसाठी गाडी चालवण्याची कालमर्यादा ओलांडली असू शकते.

तुमच्या खात्याच्या स्टेटसमध्ये बदल

तुम्ही ऑनलाइन का जाऊ शकत नाही याबद्दल तुम्हाला “Uber कडून मेसेज” हे ईमेल (स्पॅम फोल्डरसह) आले आहे का आणि तुमच्या ॲपच्या इनबॉक्स विभागात Uber कडून कोणतेही मेसेजेस आले आहेत का ते तपासा.

सामान्य कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • कागदपत्रे कालबाह्य झाली आहेत किंवा पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे
  • अलीकडे अपलोड केलेल्या नवीन कागदपत्रांचा आढावा प्रलंबित आहे
  • खाते होल्डवर आहे

वरील बाबी तपासल्यानंतरही तुम्हाला समस्या येत असल्यास कृपया खालील फील्ड्स भरा आणि आम्ही मदतीसाठी संपर्क साधू.