माझा फोन चार्ज होत नाही

फोन तुमच्या वाहनाला प्लग इन केला असताना तुमच्या फोनची बॅटरी चार्ज होत नसल्यास किंवा त्याचा चार्ज कमी होत असल्यास खालील उपाय वापरून पहा.

सॉकेट कार चार्जरवर स्विच करा

बरेच कार यूएसबी पोर्ट्स फक्त थोड्याच प्रमाणात पॉवर पुरवतात. बहुतांशी नवीन फोन क्विक चार्ज 3.0 सारख्या एका किंंवा त्याहून जास्त जलद चार्जिंग टेक्नॉलॉजींना सहाय्य करतात आणि तुमच्या फोनप्रमाणेच जलद चार्जिंग टेक्नॉलॉजीला सहाय्य करणाऱ्या पॉवर सॉकेट कार चार्जरबरोबर (यालाच सिगारेट लायटर चार्जर असेही म्हटले जाते) सर्वोत्तम पद्धतीने चालतात.

तुमच्या विशिष्ट फोन मॉडेलसाठी तयार केलेला जलद कार चार्जर ऑनलाइन शोधण्याची आणि त्यातील चांगले अभिप्राय असलेला चार्जर निवडण्याची आम्ही शिफारस करतो.

स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करा

तुमचा स्क्रीन जितका जास्त ब्राइट असतो, तितका तुमचा फोन जास्त बॅटरी पॉवर वापरतो. ड्रायव्हर ॲप वापरताना स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करून तुम्ही तुमचा फोन स्पष्टपणे पाहू शकाल एवढाच ठेवा.

नवीन केबल घ्या

तुमचा फोन चार्ज करण्यात वरील उपायांची मदत न झाल्यास तुम्हाला नवीन चार्जिंग केबल खरेदी करावी लागू शकते. आम्ही ब्रेडेड आणि अधिक जाड वायरिंग असलेली केबल घेण्याची शिफारस करतो.

पोर्टेबल पॉवर बँक वापरा

पोर्टेबल पॉवर बँकमुळे तुम्ही तुमच्या वाहनापासून दूर असताना तुमचा फोन चार्ज करू शकता, त्यामुळे तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तो चार्ज केलेला असतो.

सर्व यूएसबी ॲडॅप्टर्स काढून टाका

चार्जिंग केबलला तुमच्या फोनमध्ये नीट बसवण्यासाठी वापरलेला कोणत्याही प्रकारचा ॲडॅप्टर चार्जिंगचा वेग कमी करू शकतो. उदाहरणार्थ, यूएसबी-सी कॉर्डपेक्षा यूएसबी-सी ॲडॅप्टर असलेली मायक्रो यूएसबी कॉर्ड (विशेषतः तो कमी-गुणवत्तेचा ॲडॅप्टर असेल तर) कमी वेगाने चार्ज करू शकते.

तुमची चार्जिंग केबल तपासा

सर्व यूएसबी पोर्ट चार्जिंग केबल्स एकाचप्रकारे काम करत नाहीत. अगदी वेगवान चार्जिंग केबल्सदेखील विविध डिव्हायसेस किती वेगाने चार्ज करतात हे त्यांच्या उत्पादकानुसार बदलते, म्हणजेच काही वेगवान चार्जिंग केबल्स इतर केबल्सइतके चांगले काम करत नाहीत.

शक्य असलेले सर्वात वेगवान चार्जिंग तुम्हाला मिळते आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही तुमच्या फोनच्या उत्पादकाकडची किंवा त्याच्यासाठी डिझाइन केलेली वेगवान चार्जिंग केबल खरेदी करण्याची शिफारस करतो.

वापरात नसलेले ॲप्स बंद करा

तुमचा फोन चार्ज होत असताना, काही पॉवर तुमचा फोन पार्श्वभूमीवर चालवत असलेल्या कामांसाठी आणि ॲप्ससाठी वापरली जाते. तुमचा फोन अधिक जलदरित्या चार्ज करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही वापरत नसलेल्या ॲप्समधून सक्तीने बाहेर पडा.