Review the process for Delivery Bag validation

2. तुम्ही नवीन बॅग खरेदी करण्याची निवड केल्यास तुम्हाला फोटो सबमिट करण्याची गरज नाही, तुमची बॅग 72 तासांच्या आत आपोआप मंजूर होईल

3. तुमच्याकडे आधीपासूनच बॅग असल्यास, सबमिट केलेल्या फोटोमध्ये खालील निकषांचे पालन होणे आवश्यक आहे हे लक्षात घ्या:

- थर्मल इन्सुलेशन दाखवण्यासाठी तुमची बॅग उघडी आहे
- तुमचे ओळखपत्र तुमचे नाव आणि फोटो स्पष्टपणे दाखवते
- तुमची बॅग नुकसान न झालेली तसेच स्वच्छ आहे
- तुमची बॅग 44 सेमी रुंदी x 35 सेमी खोली x 40 सेमी उंचीची किमान आवश्यकता पूर्ण करते
- तुमची संपूर्ण बॅग आणि आयडी फोटोमध्ये दिसत आहेत
- आम्ही Uber Eats ब्रँड नसलेल्या इन्सुलेटेड बॅग्ज स्वीकारतो

4. तुम्ही फोटो सबमिट केल्यानंतर, मंजुरी प्रक्रियेस 72 तासांपर्यंत वेळ लागेल.

5. जर तुमचे कागदपत्र मंजूर झाले तर स्थिती "प्रलंबित" वरून "सक्रिय" होईल.

6. जर तुमच्या खात्यातील आवश्यक कागदपत्रे कालबाह्य झाली असतील, गहाळ असतील किंवा नाकारली गेली तर ती कागदपत्रे अपलोड आणि मंजूर होईपर्यंत तुमचे खाते होल्डवर ठेवले जाईल.

7. या पायर्‍यांच्या आधारे तुम्ही कोणत्याही कागदपत्राच्या स्थितीची पुष्टी करू शकता आणि अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असल्यास आढावा घेऊ शकता:

- वरच्या उजव्या कोपऱ्यातील प्रोफाइल फोटोवर टॅप करा
- "खाते" टॅप करा आणि नंतर "कागदपत्रे" टॅप करा
- आढावा घेण्यासाठी यादीत असलेल्या प्रत्येक कागदपत्रा(त्रां)वर टॅप करा आणि आवश्यक असल्यास नवीन कागदपत्राचा फोटो अपलोड करा.
- प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी "सेव्ह" क्लिक करा आणि आढाव्यासाठी सबमिट करा

8. जर तुमची कागदपत्रे आधीच जोडली गेली असतील आणि त्यांची पडताळणी केली गेली असेल, तर तुमचे खातेही त्याचवेळी आपोआप सक्रिय केले जाईल.

9. याची नोंद घ्या की जर तुमची सर्व कागदपत्रे अजून जोडली गेली नसतील आणि त्यांची पडताळणी केली गेली नसेल तर तुमचे खाते सक्रिय होणार नाही. तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर आणि तुमची बॅग मिळाल्यावरच हे केले जाईल.

जर 72 तासांनंतर तुमच्या कागदपत्राचा आढावा घेतला गेला नसेल तर कृपया आम्हाला कळवा म्हणजे आम्ही त्याचा पुढे तपास करू.