स्टेट आणि फेडरल कायदा Uber ड्रायव्हर ॲप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सना, रायडर्सना मदतनीस प्राण्यांमुळे सेवा नाकारण्यापासून आणि मदतनीस प्राणी सोबत असलेल्या रायडर्सशी अन्यथाही भेदभाव करण्यापासून प्रतिबंधित करतो. Uber च्या भेदभाव विरोधी धोरणामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, या कायदेशीर बंधनाचे उल्लंघन करून भेदभावपूर्ण वर्तन करणारे ड्रायव्हर्स, ड्रायव्हर ॲप वापरण्याची त्यांची क्षमता गमावतील.
मदतनीस प्राणी हा एक असा प्राणी आहे ज्याला अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी काम करण्याचे किंवा कार्य करण्याचे प्रशिक्षण दिलेले असते.
रायडरचा प्राणी हा मदतनीस प्राणी असल्याची पुष्टी करण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार ड्रायव्हर फक्त हे दोनच प्रश्न विचारू शकतात:
रायडरचा प्राणी हा मदतनीस प्राणी आहे हे सिद्ध करणारे कागदपत्र त्यांनी सादर करावे अशी विनंती ड्रायव्हर करू शकत नाही.
मदतनीस प्राण्याने टॅग घातला पाहिजे, नोंदणीकृत असला पाहिजे किंवा तो मदतनीस प्राणी असल्याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा दाखवला पाहिजे, अशी कोणतीही आवश्यकता नाही.
मदतनीस प्राणी सोबत असलेल्या रायडर्सना सेवा देण्याचे ड्रायव्हर्सना कायदेशीर बंधन आहे.
ॲलर्जी, धार्मिक आक्षेप किंवा प्राण्यांबद्दलच्या सामान्य भीतीमुळे ड्रायव्हर मदतनीस प्राण्यांसोबत असणाऱ्या रायडर्सना कायद्यानुसार सेवा नाकारू शकत नाही.
ड्रायव्हर ॲप वापरणाऱ्या सर्व ड्रायव्हर्सनी Uber सह केलेल्या त्यांच्या लिखित तंत्रज्ञान सेवा करारानुसार, त्यांना मदतनीस प्राण्यांसोबत असलेल्या रायडर्सना सेवा देण्याच्या त्यांच्या कायदेशीर बंधनाची जाणीव करून देण्यात आली आहे आणि त्यांनी कायद्याचे पालन करण्यास सहमती दाखवली आहे. एखाद्या ड्रायव्हरने रायडरला त्यांच्या मदतनीस प्राण्यामुळे नेण्यास नकार दिल्यास, ड्रायव्हर कायद्याचे उल्लंघन करत असून Uber सोबतच्या त्यांच्या कराराचे उल्लंघन करतो.
रायडरच्या मदतनीस प्राण्यामुळे ड्रायव्हरने जाणूनबुजून त्यांची वाहतूक करण्यास नकार दिला असे Uber च्या निदर्शनास आल्यास, ड्रायव्हरला ड्रायव्हर ॲप वापरण्यापासून कायमस्वरूपी प्रतिबंधित केले जाईल. घटनेचा आढावा घेतल्यानंतर Uber स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार हे निर्धारित करेल.
Uber ला रायडर्सकडून एखाद्या विशिष्ट ड्रायव्हरने मदतनीस प्राण्यासोबत असलेल्या रायडरची वाहतूक करण्यास नकार दिल्याच्या एकाहून अधिक वेळा वाजवी तक्रारी मिळाल्यास, ड्रायव्हरने दिलेल्या समर्थनात्मक स्पष्टीकरणाची पर्वा न करता, ड्रायव्हरला ड्रायव्हर ॲप वापरण्यापासून कायमस्वरूपी प्रतिबंधित केले जाईल.
एखाद्या रायडरला राईड रद्द करणे, छळवणूक किंवा स्वच्छतेचे अयोग्य शुल्क यासह त्यांच्या मदतनीस प्राण्याशी संबंधित काही समस्या असल्यास, रायडर अशा समस्येबाबतची तक्रार Uber कडे करू शकतो.
रायडरने मदतनीस प्राण्याबाबतची तक्रार सबमिट केल्यानंतर, Uber ची विशेष सहाय्य टीम या समस्येची तपासणी करेल आणि Uber च्या तंत्रज्ञान सेवा करार आणि या मदतनीस प्राण्यांविषयीच्या धोरणानुसार उचित कारवाई करेल. त्यानंतर Uber ची विशेष सहाय्य टीम एका आठवड्याच्या आत, रायडरला तपासाचा निकाल आणि केलेली कारवाई यांबाबत सूचित करण्याचा वाजवी आणि सद्भावनात्मक प्रयत्न करेल.
Uber रायडर ॲपवरून तक्रार दाखल करण्यासाठी, मला मदतनीस प्राण्याविषयी समस्येची तक्रार करायची आहे या तक्रार स्क्रीनवर नॅव्हिगेट करा, जी 'ट्रिप तपशील स्क्रीन' आणि 'खाते मेनू बटण' दोन्हीद्वारे उपलब्ध आहे.
रायडर्स त्यांच्या मदतनीस प्राण्यांसोबत प्रवास करत आहेत म्हणून त्यांना सेवा नाकारली जाऊ शकत नाही. ड्रायव्हरने मदतनीस प्राण्यामुळे रायडरला सेवा नाकारल्यामुळे, त्यांना ट्रिप रद्द केली जाण्याच्या सर्व शुल्कांचा किंवा आकारलेल्या इतर शुल्कांचा परतावा दिला जाईल.
Uber ने ड्रायव्हरसोबतचा त्यांचा करार संपुष्टात आणला आहे का यासह, रायडर्सना त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती दिली जाईल.
ड्रायव्हरने मदतनीस प्राण्यामुळे रायडरची वाहतूक करण्यास नकार दिल्याच्या तक्रारीच्या परिणामस्वरूप ड्रायव्हरचा Uber सोबतचा कंत्राटी संबंध संपुष्टात आणला गेल्याच्या प्रत्येक प्रसंगासाठी रायडरला $25 चे खाते क्रेडिट प्रदान केले जाईल.
Riders will be refunded any cleaning fees charged for shedding by their service animals.
A rider will not be charged for the first or second reported mess involving a service animal’s bodily fluids or hair. A rider can be charged for the third reported mess involving a service animal’s bodily fluids or hair. The rider may contest that such a mess occurred by responding to the fee notification email to notify customer support. If a rider contests the cleaning fee, Uber will make a reasonable good faith effort to determine whether a mess occurred.