Uber Eats वर स्कूटरने डिलिव्हरी करण्यासाठी साइन अप करणे

स्कूटरसह डिलिव्हरी करण्यासाठी साइन अप करण्यास, तुम्हाला तुमचे नाव, सामाजिक सुरक्षा क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती आणि जन्मतारीख तसेच तुमची वाहन माहिती लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर, आमच्या प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक भागीदाराने पार्श्वभूमी तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे. यास अनेक दिवस लागू शकतात, परंतु प्लॅटफॉर्मची सुरक्षितता राखण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल आहे. एकदा ते पूर्ण झाले की, तुम्ही Uber प्लॅटफॉर्मवर डिलिव्हरीज स्वीकारणे आणि कमाई करणे सुरू करू शकता.

वैध ड्रायव्हिंग लायसन्स किंवा फोटो आयडी, प्रोफाइल फोटो आणि वाहन विमा कागदपत्रे, तुमच्या पहिल्या डिलिव्हरीच्या 14 दिवसांच्या आत ड्रायव्हर ॲपमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. ते तुमच्या खात्यात जोडले नसल्यास, ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही ऑनलाइन जाऊ शकणार नाही.

खाली आवश्यकतांचा अधिक तपशीलवार आढावा घ्या. तुम्ही तयार झालात की, डिलिव्हरी करण्यासाठी साइन अप करा.

पात्रता आवश्यकता (आवश्यकता शहरानुसार बदलू शकतात)

  • वय किमान 19 वर्षे असावे
  • 50 सीसीपेक्षा कमी मोटर असलेली स्कूटर/मोपेड असावी
  • वैध ड्रायव्हिंग लायसन्स, स्कूटर नोंदणी आणि वाहन विमा असावा
  • साइन अप करताना वाहतूक पद्धती अंतर्गत "स्कूटरसह डिलिव्हरी करा" निवडण्याची खात्री करा

कागदपत्राच्या आवश्यता

तुमच्या पात्रतेची पुष्टी करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल. खाली सूचीबद्ध केलेल्या आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करताना, कृपया याची खात्री करा:

  • कागदपत्राचा फोटो स्पष्ट असून सर्व मजकूर सुवाच्य आहे
  • कागदपत्राचे सर्व चार कोपरे दिसत आहेत
  • कागदपत्राची मुदत संपली नाही किंवा लवकरच संपणार नाही

ड्रायव्हिंग लायसन्स

  • व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्सेस स्वीकारली जातात
  • फोटो स्पष्टपणे दिसला पाहिजे
  • नाव प्रोफाइलवरील नावाशी जुळले पाहिजे
  • कागदपत्राचा फोटो असणे आवश्यक आहे, स्कॅन केलेली कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत

वाहन नोंदणी

  • तुमच्या स्कूटर/मोपेडसाठी वैध यूएस राज्य नोंदणी
  • विमा कागदपत्रांवरील व्हिआयएनशी व्हिआयएन जुळणे आवश्यक आहे
  • Uber Eats सह डिलिव्हरी करण्यासाठी वाहन तपासणी आवश्यक नाही

वाहन विमा

  • विमा कागदपत्रावर नमूद केलेले नाव प्रोफाइलवरील नावाशी जुळले पाहिजे
  • विमा कागदपत्रावरील व्हिआयएनशी नोंदणीवरील व्हिआयएन जुळणे आवश्यक आहे
  • व्यावसायिक विमा स्वीकारला जातो

पार्श्वभूमी तपासण्या

  • Uber सर्व यूएस ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींसाठी तृतीय-पक्ष प्रदाता, चेकरकडून पार्श्वभूमी तपासण्या मिळवते.
  • बहुतांश पार्श्वभूमी तपासण्या कामकाजाच्या 3-5 दिवसांत पूर्ण केल्या जातात.
  • त्यानंतर Uber ला तुमचा पूर्ण झालेला अहवाल चेकरकडून प्राप्त होतो आणि तो Uber प्लॅटफॉर्मवर तुमची पात्रता निश्चित करण्यासाठी परिणामांचा आढावा घेतो.