मला माझा प्रोफाईल फोटो अपडेट करायचा आहे

तुमचे रूप बदलल्यामुळे जर तुम्हाला ओळखता येणार नसेल, तरच प्लॅटफॉर्म वापरणार्‍या प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, तुमचा प्रोफाइल फोटो अपलोड केला जाऊ शकतो, जसे की:

  • वजनात लक्षणीय बदल
  • चेहऱ्यात विकृती येणे
  • वैद्यकीय आजार
  • प्लास्टिक किंवा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया

तुमचा मूळ फोटो घेतल्यापासून तुमच्या दिसण्यात बदल झाला असल्यास, कृपया अपडेटची विनंती करण्यासाठी खालील फॉर्म भरा.

लक्षात असू द्या की, चांगल्या प्रोफाइल फोटोमध्ये खालील घटक असावेत:

  • टोपी किंवा सनग्लासेस नसावेत (चष्मा आणि धार्मिक कपड्यांना परवानगी आहे)
  • पूर्ण चेहरा आणि खांद्याचा वरचा भाग
  • उत्तम प्रकाशयोजना
  • अस्पष्ट नसावा
  • फोटोत फक्त एकच व्यक्ती असावी
  • चेहरा फ्रेमच्या मधोमध असावा आणि थेट कॅमेऱ्याकडे बघावे
  • कोणतेही फिल्टर, फोटोचे फोटो किंवा फोटोशॉप प्रतिमा नसाव्यात