तुम्ही या राईडची विनंती केलीच नसल्यास, हे शक्य आहे की तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने तुमच्या खात्यात लॉग इन केले असेल आणि अजाणतेपणाने तुमच्या खात्यावर राईडची विनंती केली असेल. आमच्याशी संपर्क साधण्यापूर्वी, तुमच्या Uber खात्याचा किंवा पेमेंट पद्धतीचा ॲक्सेस असणाऱ्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांंना विचारणे चांगले असते.
तुम्ही राईडची विनंती केली पण तुमचा ड्रायव्हर आला नाही असे झाले असल्यास, दुसऱ्या रायडरने चुकून राईड घेतलेली असू शकते.
भविष्यात अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी, तुम्ही ॲपमध्ये तुमच्या राईडची पडताळणी करा चालू करू शकता. ते केल्यास तुम्हाला 4-अंकी पिन मिळेल जो ड्रायव्हरला तुम्ही योग्य कारमध्ये आहात याची खात्री करण्यात मदत करतो. तुम्ही येथे अधिक तपशील आणि सूचना शोधू शकता .
तुम्ही वरील शिफारशींचे पालन केल्यावरही, इतर कोणीतरी घेतलेल्या राईडसाठी तुमच्याकडून शुल्क आकारले गेल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया खाली राईडचे तपशील द्या आणि आम्ही आनंदाने मदत करू:
टीप: क्लेम्स वैध आहेत याची खात्री करण्यासाठी प्रत्येक अहवालाचा आढावा घेतला जातो.