तुमच्या खात्यावरील पेमेंट पद्धत अपडेट करणे

पसंतीची पेमेंट पद्धत जोडल्यानंतर ती निवडून तुम्हाला राईडची विनंती करता येईल. तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स, पेपॅल, वेन्मो, डिजिटल वॉलेट्स आणि Uber गिफ्ट कार्ड्स समाविष्ट असलेल्या पेमेंट पद्धती जोडू शकता. राईड संपल्यावर, तुमच्या निवडलेल्या पेमेंट पद्धतीवर शुल्क आकारले जाते.

राईडदरम्यान, तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडली आहे हे तपासण्यासाठी तुमचे ॲप वापरा. ट्रिप संपण्यापूर्वी ॲपच्या तळापासून वर स्वाइप करा आणि तुमच्या इच्छित पेमेंट पद्धतीवर टॅप करा.

पेमेंट पद्धत जोडा

  1. तुमच्या ॲप मेनूमधून "वॉलेट" निवडा.
  2. "पेमेंट पद्धत जोडा" वर टॅप करा.
  3. कार्डाची माहिती स्वहस्ते लिहून, कार्ड स्कॅन करून किंवा पर्यायी पेमेंट प्रकार जोडून पेमेंट पद्धत जोडा.

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्कॅन करा

  1. कार्ड स्कॅन करण्यासाठी, कॅमेरा चिन्हावर टॅप करा. तुमचा फोन Uber ॲपला कॅमेरा वापरू देण्याची परवानगी मागू शकतो.
  2. तुमचे कार्ड तुमच्या फोनच्या स्क्रीनवर मध्यभागी येऊ द्या जेणेकरून सर्व 4 कोपरे हिरवे दिसतील. एम्बॉस केलेली अक्षरे आणि संख्या असलेली कार्ड्स सामान्यतः स्कॅन करण्यासाठी सर्वात सोपी असतात.
  3. कार्डाची कालबाह्यता तारीख, सीव्हीव्ही क्रमांक आणि बिलिंगचा पिन कोड किंवा पोस्टल कोड लिहा.
  4. "सेव्ह करा" वर टॅप करा.

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वतः जोडा

  1. तुमचा कार्ड क्रमांक लिहा.
  2. कालबाह्यता तारीख, सीव्हीव्ही क्रमांक आणि बिलिंगचा पिन कोड किंवा पोस्टल कोड लिहा.
  3. "सेव्ह करा" वर टॅप करा.

कार्ड माहिती अपडेट करा

तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डाची कालबाह्यता तारीख, सीव्हीव्ही क्रमांक आणि बिलिंग पिन किंवा पोस्टल कोड संपादित करू शकता. तुमच्याकडे Uber for Business प्रोफाइल असल्यास तुम्ही तुमच्या मेनूमधील सेटिंग्ज निवडून तुमच्या कार्डाशी संबंधित असलेले प्रोफाइलसुद्धा बदलू शकता. सुरुवात करण्यासाठी प्रोफाइल्स निवडा.

  1. तुमच्या ॲप मेनूमधून "पेमेंट" निवडा.
  2. तुम्हाला अपडेट करायचा असलेला पेमेंट पर्याय निवडा.
  3. तीन ठिपक्यांच्या चिन्हावर टॅप करा, नंतर "संपादित करा" वर टॅप करा.
  4. बदल करा, ते करून झाल्यावर "सेव्ह करा" वर टॅप करा.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक संपादित करता येत नसला तरीही, तुमच्या खात्यातून कार्ड काढून टाकले जाऊ शकते आणि नंतर नवीन पेमेंट पद्धत म्हणून पुन्हा जोडले जाऊ शकते.

पेमेंट पद्धत हटवा

तुमच्या खात्यात नेहमी किमान एक तरी पेमेंट पद्धत असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमची एकमेव पेमेंट पद्धत हटवू इच्छित असल्यास, तुम्हाला आधी एक नवीन पद्धत जोडावी लागेल.

  1. तुमच्या ॲप मेनूमधून "पेमेंट" निवडा.
  2. तुम्हाला हटवायचे असलेले कार्ड निवडा.
  3. वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपके असलेल्या चिन्हावर टॅप करा.
  4. "हटवा" वर टॅप करा, नंतर पुष्टी करा.