तुमचे Uber खाते सुरक्षित ठेवणे

फिशिंग म्हणजे काय?

फिशिंग म्हणजे तुमच्याकडून तुमची Uber खाते माहिती (ईमेल, फोन नंबर किंवा पासवर्ड) चलाखीने काढून घेण्याचा प्रयत्न. फिशिंगचे प्रयत्न अनेकदा अवांछित ईमेल किंवा एसएमएस वापरून केले जातात ज्यात बनावट लॉगिन पृष्ठावर जाणारी लिंक किंवा अटॅचमेंट असते. Uber कर्मचारी कधीही ईमेल किंवा फोनद्वारे तुमचा पासवर्ड किंवा ईमेल पत्त्यासह तुमच्या खात्याच्या कोणत्याही माहितीची विनंती करणार नाहीत.

तुम्हाला तुमचा Uber खाते ईमेल किंवा पासवर्ड लिहिण्यास सांगितले गेल्यास, तुमच्या ब्राउझरचा ॲड्रेस बार https://www.uber.com ही URL दाखवत असल्याची खात्री करा.

फिशिंगचा संशय आल्यास काय करावे

तुम्हा‍ला Uber कडून असल्याचा दावा करणारा आणि तुम्हा‍ला https://www.uber.com कडील नसलेल्या बाह्य लिंकवर जाण्याची सूचना करणारा मेसेज आल्यास, त्या लिंकवर क्लिक करू नका आणि प्रतिसाद म्हणून कोणतीही माहिती देऊ नका.

तुमचे खाते सुरक्षित कसे ठेवावे

  • एक युनिक पासवर्ड वापरा जो तुम्ही इतर वेबसाइट्सवर वापरत नाही
  • तुमच्या पासवर्डमध्ये लोअरकेस आणि अपरकेस अक्षरे, संख्या आणि किमान एक चिन्ह अशी किमान 10 वर्ण आहेत याची खात्री करा.
  • तुमची लॉगिन माहिती फक्त https://www.uber.com वर द्या
  • तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सर्वात अलीकडील अपडेट्स आणि अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर असल्याची खात्री करा