मी Uber खाते कसे तयार करू?

Uber खाते तयार करण्यासाठी एक वैध ईमेल पत्ता आणि फोन नंबर आवश्यक आहे. तसेच तुम्हाला पासवर्डदेखील तयार करावा लागेल आणि नियम आणि अटींना व आमच्या गोपनीयता सूचनेला सहमती द्यावी लागेल.

  1. तुमचे नाव आणि आडनाव, फोन नंबर व पसंतीची भाषा लिहा.
  2. तुम्ही साइन-अप प्रक्रियेचा हा भाग पूर्ण केल्यावर तुमच्या फोन नंबरची पडताळणी करण्यासाठी आम्ही एक टेक्स्ट एसएमएस पाठवतो.
  3. त्यानंतर, तुमची पेमेंट माहिती लिहा. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड नंबर टाकल्यामुळे प्रत्येक राईडनंतर तुमच्या ट्रिपची भाडी आपोआप आकारली जातात.
  4. तुम्ही ही माहिती दिल्यानंतर, तुमच्या खाते नोंदणीची पुष्टी करण्यासाठी आम्ही एक ईमेल पाठवू.