ड्रायव्हर्सनी दिव्यांग रायडर्सच्या वाहतुकीचे सर्व लागू राज्य, फेडरल आणि स्थानिक कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
- ड्रायव्हरने दिव्यांग रायडर्सना सामावून घेण्याच्या कायद्यांचे उल्लंघन करणे हे तंत्रज्ञान सेवा कराराचे उल्लंघन आहे.
- त्या अनुषंगाने, ड्रायव्हर्सनी वॉकर्स, केन्स, फोल्डिंग व्हीलचेअर्स किंवा इतर सहाय्यक साधने वापरणाऱ्या रायडर्सना गाडीत घेण्याचा शक्य तितका प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
- बेकायदेशीरपणे भेदभाव केल्याची कोणतीही तक्रार आल्यास, Uber त्या घटनेचा आढावा घेत असताना ड्रायव्हरचे खाते तात्पुरते निष्क्रिय केले जाईल.
- दिव्यांग रायडर्सच्या संदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याची पुष्टी झाल्यास Uber ॲपवरील ॲक्सेस कायमचा काढून घेतला जाऊ शकतो.
Uber वरील ॲक्सेसिबिलिटीबद्दल अधिक माहिती खाली आढळू शकते.