व्यवसायांकडील व्हाउचर्स वापरणे

विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणाऱ्या राईड्ससाठी किंवा Uber Eats ऑर्डर्ससाठी क्रेडिट देण्याकरता व्यवसाय व्हाउचर्स देऊ शकतात. तुमचे व्हाउचर केवळ राईड्ससाठी वापरले जाऊ शकते की ते राईड्स आणि ऑर्डर्स दोन्हीसाठी वापरले जाऊ शकते हे ॲप तुम्हाला सांगेल.

तुम्ही Uber for Business वापरणारे ॲडमिन किंवा समन्वयक आहात का? Uber for Business मदत केंद्रावर व्हाउचर्स व्यवस्थापित करण्यासाठी मदत मिळवा.

व्हाउचर रिडीम करा

  1. Uber ॲपमध्ये साइन इन करा किंवा uber.com वर खाते तयार करा.
  2. व्हाउचर क्लेम करण्यासाठी तुमच्या ईमेलमधील लिंकवर क्लिक करा.
  3. व्हाउचर आपोआप तुमच्या खात्यामध्ये जोडले जाईल आणि तुमच्या पुढील पात्र ट्रिप किंवा ऑर्डरवर लागू होईल.

तुम्ही तुमचे वैयक्तिक प्रोफाइल वापरत असल्याची खात्री करा. बिझनेस प्रोफाइलवर व्हाउचर्स काम करत नाहीत.

टीप: व्हाउचर्स फक्त ट्रिप किंवा ऑर्डरच्या भाड्यावर लागू होतात. तुमच्या ड्रायव्हरसाठी टिप्स आणि व्हाउचर रकमेपेक्षा जास्त असलेल्या रकमा तुमच्या वैयक्तिक पेमेंट पद्धतीद्वारे आकारल्या जातील.

तुमच्या खात्यावर व्हाउचर्स पहा

  1. तुमचे Uber ॲप उघडा आणि "खाते" वर टॅप करा.
  2. “वॉलेट” वर टॅप करा.
  3. खाली स्क्रोल करून "व्हाउचर्स" वर टॅप करा.

व्हाउचर दुसऱ्या ट्रिपसाठी राखून ठेवा

  1. “कुठे जायचे?” फील्डमध्ये तुमचे अंतिम ठिकाण लिहा.
  2. वाहन पर्याय निवडा.
  3. “[वाहन प्रकार] निवडा” बटणावरील पेमेंट पद्धतीवर टॅप करा.
  4. व्हाउचरच्या शेजारील “बदला” वर टॅप करा आणि वेगळी पेमेंट पद्धत निवडा.

टीप: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त राईड प्रोफाइल असल्यास, ट्रिपसाठी व्हाउचर वापरण्यापूर्वी तुम्हाला ते ज्या प्रोफाइलवर आहे ते प्रोफाइल निवडावे लागेल.