तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डासाठीचा सीव्हीव्ही क्रमांक किंवा बिलिंग झिप कोड चुकीचा टाकलेला असेल तर, तुम्हाला कदाचित ट्रिपनंतर तुमच्या पेमेंटवर प्रक्रिया करण्यात त्रुटी आली असल्याचा मेसेज मिळेल.
पेमेंट पद्धत काढून टाका, नंतर पुन्हा जोडा व सर्व माहिती खरी आहे याची खात्री करा.
तुम्हाला पेमेंट त्रुटींविषयीचा मेसेज मिळणे चालू राहिले तर, तुमचे पेमेंट खाते सक्रिय आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची पडताळणी केलेली आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या आर्थिक संस्थेशी संपर्क साधा.