तुम्ही टिप देण्यास स्वतंत्र असून ड्रायव्हर्स ते स्वीकारण्यास स्वतंत्र आहेत.
ॲपद्वारे तुम्ही तुमच्या ट्रिपच्या शेवटी तुमच्या ड्रायव्हरला टिप देऊ शकता. रेटिंग देण्यासाठी सूचित केल्यावर, प्रथम तुमच्या ड्रायव्हरसाठी रेटिंग निवडा आणि त्यानंतर तुम्हाला टिपदेखील जोडण्याचा पर्याय दिला जाईल.
तुम्ही ॲपद्वारे, riders.uber.com वर आणि तुमच्या ईमेल केलेल्या ट्रिप पावतीवरून मागील ट्रिपसाठीदेखील टिप देऊ शकता.
ॲप किंवा riders.uber.com वरून मागील ट्रिपसाठी टिप देण्यास, तुमच्या ट्रिप इतिहासातून ती ट्रिप निवडा आणि टिप जोडा वर क्लिक करा.
तुम्हाला ईमेल केलेल्या तुमच्या ट्रिप पावतीवरून, टिप जोडा वर क्लिक करा.
शेवटी, तुम्ही ट्रिपवर असतानादेखील तुमच्या ड्रायव्हरला टिप देण्याचा पर्याय तुम्ही पाहू शकता. तुम्ही संपूर्ण ट्रिपमध्ये कधीही टिपची रक्कम संपादित करू शकाल.
ट्रिप संपल्यानंतर, ॲपमध्ये, riders.uber.com वर किंवा तुमच्या ईमेल केलेल्या ट्रिप पावतीवरून टिप देण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवस आहेत. त्याऐवजी तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला कॅशदेखील देऊ शकता.
टीप: विभाजित भाडे असलेल्या ट्रिप्ससाठी, ज्या रायडरने मुळात ट्रिपची विनंती केली होती फक्त तोच ट्रिपसाठी टिपची रक्कम निवडू शकेल. मूळ विनंतीकर्त्याने टिप जोडली असल्यास, ती इतर प्रवाशांसह विभागली जाणार नाही.
टिप्सवर Uber शून्य सेवा शुल्क घेते.