राईड आधीच शेड्युल करणे

तुमच्या राईडची पुष्टी करण्यापूर्वी घड्याळाच्या चिन्हावर टॅप करून तुम्हाला पिकअप केले जाण्याची इच्छा असेल तेव्हापासून 30 मिनिटे ते 30 दिवस आधीपर्यंत Uber राईड शेड्युल करा.

शेड्युल केलेल्या राईड्स कसे काम करतात

'शेड्युल केलेल्या राईड्स' या वैशिष्ट्याद्वारे ड्रायव्हरने तुम्हाला पिकअप करायला येण्यासाठीची वेळ तुम्ही निवडू शकता. तुमच्या निवडलेल्या पिकअप वेळेपूर्वी ॲप तुमच्यावतीने राईडची विनंती पाठवेल. तुम्हाला ड्रायव्हरशी जुळवले गेल्यावर आणि ते जवळपास आल्यावर तुम्हाला तशाच प्रकारे पुश सूचना मिळतील जशा तुम्हाला इतर राईड्समध्ये मिळतात.

हे लक्षात ठेवा:

  • राईड आधी शेड्युल करणे हे तुम्हाला ड्रायव्हरशी कनेक्ट केले जाईलच याची हमी देत नाही.
  • क्वचित प्रसंगी तुम्हाला ड्रायव्हरशी कनेक्ट केले न गेल्यास आम्ही तुम्हाला तसे सूचित करू.
  • तुमच्या राईडच्या वेळी मागणीवर आधारित भाडे लागू होऊ शकते. तुमचे भाडे बदलले असल्यास आम्ही तुम्हाला कळवू.

राईड शेड्यूल करण्यासाठी:

  1. “कुठे जायचे?” फील्डमध्ये तुमचे अंतिम ठिकाण लिहा.
  2. वाहनांचे पर्याय स्वाईप करा आणि तुमच्या राईडकरता एक पर्याय निवडण्यासाठी त्यावर टॅप करा.
  3. "निवडा" बटणाच्या बाजूच्या घड्याळ चिन्हावर टॅप करा.
  4. तुमच्या पिकअपसाठी तारीख आणि वेळ सेट करा.
  5. "पिकअप वेळ सेट करा" वर टॅप करा.
  6. आवश्यक असल्यास तुमचे पिकअप लोकेशन अपडेट करा, नंतर "आरक्षित करा" वर टॅप करा.
  7. "पिकअपची पुष्टी करा" वर टॅप करून तुमच्या पिकअप लोकेशनची पुष्टी करा.

शेड्युल केलेली राईड रद्द करण्यासाठी:

  1. मुख्य स्क्रीनवरून, “खाते” आणि नंतर “ट्रिप्स” वर टॅप करा.
  2. "मागील" ड्रॉपडाउन निवडून नंतर "आगामी" निवडा.
  3. तुम्हाला रद्द करायच्या असलेल्या राईडच्या खाली, "राईड रद्द करा" वर टॅप करा.
  4. "आरक्षण रद्द करा" वर टॅप करून रद्द करण्याची पुष्टी करा.

ड्रायव्हरशी जुळवले जाण्यापूर्वी तुम्ही कधीही कोणत्याही शुल्काशिवाय तुमची विनंती रद्द करू शकता. ड्रायव्हरने तुमची ट्रिप विनंती स्वीकारल्यानंतर रद्द करण्याचे सामान्य शुल्क लागू होते.

हे कुठे आणि कधी उपलब्ध आहे?

शेड्युल केलेल्या राईड्स तुमच्या भागामध्ये उपलब्ध आहेत का हे पाहण्यासाठी तुमचे ॲप तपासा. उपलब्ध असल्यास, तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी राईड शेड्युल करू शकता.

तुम्ही एयरपोर्टला जाणाऱ्या ट्रिप्स शेड्युल करू शकता पण एयरपोर्टहून निघताना नाही. तुम्ही एयरपोर्टहून निघत असाल तर तुम्ही मागणीनुसार राईडची विनंती केली पाहिजे.