मला माझे Uber खाते हटवण्यात मदत हवी आहे

आमच्या सहाय्य टीमशी संपर्क साधण्यापूर्वी खालील लिंकद्वारे तुमचे खाते हटवण्याचा प्रयत्न करा.

टीप: त्याच खाते तपशिलांसह तुमचे Uber Eats खाते असल्यास, तुमची विनंती पूर्ण झाल्यावर तेदेखील हटवले जाईल.

या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, Uber तुम्हाला तात्पुरता पडताळणी कोड वापरुन तुमची ओळख पटवायला सांगेल. यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात फोन नंबर जोडण्याची आवश्यकता असू शकते. तुम्ही तुमच्या खात्याच्या सेटिंग्जमध्‍ये फोन नंबर जोडू शकत नसल्यास खालील लिंकद्वारे आमच्याशी संपर्क साधा.
तुमचे एखादे पेमेंट थकीत असल्यास तुम्ही तुमचे Uber खाते हटवू शकणार नाही. कृपया तुमचे खाते हटवण्यापूर्वी पेमेंट पूर्ण करा.

तुम्ही तुमचे खाते हटवल्यावर ते लगेच निष्क्रिय केले जाईल. 30 दिवसानंतर ते कायमचे हटवले जाईल आणि कोणतीही न वापरलेली क्रेडिट्स, प्रमोशन्स किंवा रिवॉर्ड्स हटवली जातील.

खाते हटवल्यानंतर कायद्याच्या आवश्यकतेनुसार किंवा परवानगीनुसार Uber काही विशिष्ट माहिती राखून ठेवू शकते.

तुम्ही तुमचा विचार बदलला आणि तुम्हाला तुमचे खाते कायम ठेवायचे असेल तर ते रीस्टोअर करण्यासाठी निष्क्रिय केल्यापासून 30 दिवसांच्या आत uber.com वर साइन इन करा.

तुम्हाला तुमचे खाते हटवण्यासाठी अजूनही मदत हवी असल्यास, कृपया खाली योग्य चेकबॉक्स निवडा: