डिव्हाइसच्या मालकीची पडताळणी करण्यासाठी Uber तुमच्या फोन नंबरचा स्क्रीनशॉट मागू शकतो. तुमच्या डिव्हाइसला लागू होणाऱ्या खालील पायऱ्यांचे पालन करा.
आयओएस डिव्हायसेस
- डिव्हाइसवर "सेटिंग्ज" उघडा.
- खाली स्क्रोल करा आणि "फोन" निवडा.
- "माझा नंबर" च्या पुढे दिलेला नंबर कॅप्चर करणारा स्क्रीनशॉट घ्या.
- तो फोटो तुमच्या डिव्हाइसवरील "फोटोज" ॲपमध्ये तुमच्या इतर इमेजेससह सेव्ह केला जाईल.
अँड्राइड डिव्हायसेस
लोकेशन तुमच्या अँड्रॉइड ओएसच्या आवृत्तीनुसार बदलू शकते. बऱ्याच आवृत्त्यांसाठी, तुम्ही खालील पायऱ्या वापरू शकता.
- "सेटिंग्ज" उघडा.
- खाली स्क्रोल करा आणि "फोनबद्दल" किंवा "डिव्हाइसबद्दल" निवडा.
- फोन नंबर या स्क्रीनवर दाखवला जाऊ शकतो. तसे नसल्यास, "फोन ओळख" किंवा "स्थिती" नंतर "सिम स्थिती" निवडा.
- पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कमी करायचे बटण एकाच वेळी दाबून तुमच्या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या.