तुमच्या फोन नंबरचा स्क्रीनशॉट घेणे

डिव्हाइसच्या मालकीची पडताळणी करण्यासाठी Uber तुमच्या फोन नंबरचा स्क्रीनशॉट मागू शकतो. तुमच्या डिव्हाइसला लागू होणाऱ्या खालील पायऱ्यांचे पालन करा.

आयओएस डिव्हायसेस

  1. डिव्हाइसवर "सेटिंग्ज" उघडा.
  2. खाली स्क्रोल करा आणि "फोन" निवडा.
  3. "माझा नंबर" च्या पुढे दिलेला नंबर कॅप्चर करणारा स्क्रीनशॉट घ्या.
  4. तो फोटो तुमच्या डिव्हाइसवरील "फोटोज" ॲपमध्ये तुमच्या इतर इमेजेससह सेव्ह केला जाईल.

अँड्राइड डिव्हायसेस

लोकेशन तुमच्या अँड्रॉइड ओएसच्या आवृत्तीनुसार बदलू शकते. बऱ्याच आवृत्त्यांसाठी, तुम्ही खालील पायऱ्या वापरू शकता.

  1. "सेटिंग्ज" उघडा.
  2. खाली स्क्रोल करा आणि "फोनबद्दल" किंवा "डिव्हाइसबद्दल" निवडा.
  3. फोन नंबर या स्क्रीनवर दाखवला जाऊ शकतो. तसे नसल्यास, "फोन ओळख" किंवा "स्थिती" नंतर "सिम स्थिती" निवडा.
  4. पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कमी करायचे बटण एकाच वेळी दाबून तुमच्या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या.