तुम्ही तुमच्या Uber खात्याचा पासवर्ड रीसेट करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधता तेव्हा तुम्हाला काही मिनिटांत एक ईमेल यायला हवे. या ईमेलमध्ये तुमचा पासवर्ड रीसेट करायला मदत करण्यासाठी एक लिंक असेल.
सुरक्षेसाठी, ही लिंक 10 मिनिटांत कालबाह्य होते. ती ताबडतोब उघडा किंवा पासवर्ड रीसेटची विनंती करण्यापूर्वी तुम्ही पासवर्ड रीसेट प्रक्रिया पूर्ण करायला तयार असेपर्यंत प्रतीक्षा करा.
तुमची पासवर्ड रीसेट लिंक चालत नसेल तर अशावेळी, कृपया uber.com/forgot-password वर पहिल्यापासून सुरुवात करा. तुमचा ईमेल पत्ता बरोबर आहे का हे तपासा, त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या पुढच्या पासवर्ड रीसेट ईमेलमधील लिंक उघडा.
तुम्ही तुमचा पासवर्ड रीसेट करू शकला नाहीत किंवा तुमच्या खात्यात प्रवेश करू शकला नाहीत तर कृपया खाली आमच्याशी संपर्क साधा.