टॉकबॅक वापरून राईडची विनंती करा

टॉकबॅक चालू केलेले असताना राईडची विनंती कशी करायची ते येथे आहे:

  1. एकदा टॅप करा, त्यानंतर “कुठे जायचे आहे?” बॉक्सवर दोनदा टॅप करा. अंतिम ठिकाण लिहा किंवा सुचवलेल्या अंतिम ठिकाणांच्या सूचीमधून निवडा.
  2. तुमचे पिकअप लोकेशन आपोआप तुमचे जीपीएस लोकेशन म्हणून सेट केले जाईल. ते बदलण्यासाठी, तुमच्या पिकअप लोकेशनवर टॅप करा, त्यानंतर तुमचे लोकेशन संपादित करण्यासाठी त्यावर दोनदा टॅप करा.
  3. तुमच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या वाहन पर्यायांवरून स्वाइप करण्यासाठी दोन बोटे वापरा. एकदा टॅप करा, त्यानंतर त्यापैकी एकाची तुमच्या राईडसाठी निवड करण्याकरता त्यावर दोनदा टॅप करा.
  4. एकदा टॅप करा, त्यानंतर तुमच्या राईडची विनंती करण्यासाठी तुमच्या स्क्रीनच्या तळाशी “पिकअपची पुष्टी करा” बटणावर दोनदा टॅप करा
  5. तुमचा ड्रायव्हर आल्यावर तुम्हाला सूचना मिळेल. मेसेज मोठ्या आवाजात वाचला जाईल.
  6. एकदा टॅप करा, त्यानंतर खालील पर्याय ॲक्सेस करण्यासाठी तुमच्या स्क्रीनच्या तळाशी असलेल्या पट्टीवर दोनदा टॅप करा:
  • तुमच्या ड्रायव्हरशी संपर्क साधा - एकदा टॅप करा, त्यानंतर गोल फोन चिन्हावर दोनदा टॅप करून तुमच्या ड्रायव्हरच्या फोन नंबरवर कॉल करा किंवा विनामूल्य कॉल करा
  • तुमची राईड रद्द करा - एकदा टॅप करा, नंतर “रद्द करा” बटणावर दोनदा टॅप करा, नंतर एकदा टॅप करा, नंतर पुष्टी करण्यासाठी “होय, रद्द करा” बटणावर दोनदा टॅप करा.
  • तुमची स्थिती शेअर करा - एकदा टॅप करा, त्यानंतर “स्थिती शेअर करा” बटणावर दोनदा टॅप करा आणि तुमच्या संपर्कांच्या सूचीतून लोकांना निवडा. तुमची राईड ट्रॅक करण्यासाठी Uber त्या संपर्कांना टेक्स्ट मेसेज पाठवेल.
  • भाडे विभाजित करा - एकदा टॅप करा, त्यानंतर “विभाजित भाडे” बटणावर दोनदा टॅप करा आणि संपर्क निवडा