अँड्रॉइडवर सेव्ह केलेल्या जागा जोडणे

कामाचे ठिकाण किंवा घर, यासारखी वारंवार जावे लागते अशी अंतिम ठिकाणे तुम्ही ॲपमध्ये जोडून ठेवू शकता.

तुमच्या घराचा किंवा कामाच्या ठिकाणचा पत्ता सेव्ह करण्यासाठी:

  1. मुख्य स्क्रीनवरून, "खाते" निवडा.
  2. “सेटिंग्ज” वर टॅप करा.
  3. “घराचा पत्ता जोडा” किंवा “कामाच्या ठिकाणचा पत्ता जोडा” वर टॅप करा
  4. तुमच्या घराचा किंवा कामाच्या ठिकाणचा पत्ता लिहा.

पत्ते तुमच्या ॲपच्या खाते सेटिंग्ज विभागामधल्या तुमच्या आवडते यादीमध्ये दिसून येतील.

'आवडते' मधून कामाचा किंवा घराचा पत्ता काढून टाकणे:

  1. मुख्य स्क्रीनवरून, "खाते" निवडा.
  2. “सेटिंग्ज” वर टॅप करा.
  3. “घर” किंवा “कामाचे ठिकाण” च्या पुढे, “हटवा” वर टॅप करा.

इतर सेव्ह केलेल्या जागा जोडणे आणि काढून टाकणे

तुम्ही एखाद्या अंतिम ठिकाणापर्यंतची ट्रिप घेतल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ॲप फीडमध्ये “हे अंतिम ठिकाण सेव्ह करा” कार्ड दिसेल:

  1. “सेव्ह केलेल्या जागांमध्ये जोडा” वर टॅप करा.
  2. त्या ठिकाणाचे नाव किंवा टोपणनाव टाइप करा (उदा. “रमेशचे घर” किंवा “पेट स्टोअर”).
  3. "सेव्ह करा" वर टॅप करा.

सेटिंग्जमधून सेव्ह केलेले ठिकाण जोडण्यासाठी:

  1. मुख्य स्क्रीनवरून, "खाते" निवडा.
  2. “सेटिंग्ज” वर टॅप करा.
  3. “सेव्ह केलेल्या अधिक जागा” आणि नंतर "सेव्ह केलेली जागा जोडा" वर टॅप करा.
  4. तुम्हाला सेव्ह करायच्या असलेल्या ठिकाणचा पत्ता लिहा.
  5. त्या ठिकाणाचे नाव किंवा टोपणनाव टाइप करा (उदा. “रमेशचे घर” किंवा “पेट स्टोअर”).
  6. "सेव्ह करा" वर टॅप करा.

सेव्ह केलेली जागा काढून टाकण्यासाठी:

  1. मुख्य स्क्रीनवरून, "खाते" निवडा.
  2. “सेटिंग्ज” वर टॅप करा.
  3. “सेव्ह केलेल्या अधिक जागा” वर टॅप करा.
  4. तुम्हाला जी जागा काढून टाकायची आहे त्याशेजारील तीन ठिपक्यांवर टॅप करा.
  5. "काढून टाका" निवडा.