आयओएसवर सेव्ह केलेल्या जागा जोडणे

कामाचे ठिकाण किंवा घर, यासारखी वारंवार जावे लागते अशी अंतिम ठिकाणे तुम्ही ॲपमध्ये जोडून ठेवू शकता.

तुमच्या घराचा किंवा कामाच्या ठिकाणचा पत्ता सेव्ह करण्यासाठी:

  1. ॲपमध्ये "खाते" वर टॅप करा.
  2. “सेटिंग्ज” वर टॅप करा.
  3. “घराचा पत्ता जोडा” किंवा “कामाच्या ठिकाणचा पत्ता जोडा” वर टॅप करा
  4. पत्ता लिहा.

पत्ते तुमच्या ॲपच्या सेटिंग्ज विभागामधल्या तुमच्या आवडते यादीमध्ये दिसून येतील.

'आवडते' मधून कामाचा किंवा घराचा पत्ता काढून टाकण्यासाठी:

  1. ॲपमध्ये "खाते" वर टॅप करा.
  2. “सेटिंग्ज” वर टॅप करा.
  3. तुम्हाला जे ठिकाण हटवायचे आहे त्यावर टॅप करा आणि हटवण्यासाठी ते डावीकडे सरकवा.

सेव्ह केलेल्या जागांमध्ये अंतिम ठिकाणे जोडणे आणि काढून टाकणे

तुम्ही एखाद्या अंतिम ठिकाणापर्यंतची ट्रिप घेतल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ॲप फीडमध्ये हे अंतिम ठिकाण सेव्ह करा कार्ड दिसेल.

सेव्ह केलेली जागा जोडण्यासाठी:

  1. “सेव्ह केलेल्या जागांमध्ये जोडा” वर टॅप करा.
  2. त्या जागेचे नाव किंवा टोपणनाव टाइप करा (उदा. “रमेशचे घर” किंवा “पेट स्टोअर”)
  3. "जागा सेव्ह करा" वर टॅप करा.

तुम्ही एखाद्या अंतिम ठिकाणापर्यंतची ट्रिप घेतल्यानंतरच ते ठिकाण सेव्ह केलेली जागा म्हणून उपलब्ध होईल.

सेव्ह केलेली जागा काढून टाकण्यासाठी:

  1. ॲपमध्ये "खाते" वर टॅप करा.
  2. “सेटिंग्ज” वर टॅप करा.
  3. “सेव्ह केलेल्या अधिक जागा” वर टॅप करा.
  4. तुम्हाला जी जागा काढून टाकायची आहे त्यावर टॅप करा
  5. "हटवा" वर टॅप करा.