Uber चे कार्य कसे चालते?

Uber हा एक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आहे. आमची स्मार्टफोन ॲप्स ड्रायव्हर्स आणि रायडर्सना आपसात कनेक्ट करतात.

ज्या शहरांमध्ये Uber सेवा उपलब्ध आहेत, तेथे राईडची विनंती करण्यासाठी ॲप वापरा. जवळपासच्या ड्रायव्हरने तुमची विनंती स्वीकारल्यावर, ॲपमध्ये तुमच्या पिकअप लोकेशनच्या दिशेने निघालेल्या ड्रायव्हरच्या आगमनाची अंदाजे वेळ दाखवली जाते. ड्रायव्हर अगदी जवळ पोहचल्यावर ॲप तुम्हाला त्याची सूचना देते.

ॲप तुम्ही ज्या ड्रायव्हरसोबत राईड करणार आहात त्यांचे नाव, वाहनाचा प्रकार, आणि लायसन्स प्लेट क्रमांक यांसह त्यांच्या विषयीची माहितीदेखील देते. ही माहिती तुम्हा दोघांना पिकअप लोकेशनवर भेटण्यास उपयुक्त ठरते.

राईडच्या आधी किंवा दरम्यान कधीही तुमचे पसंतीचे अंतिम ठिकाण लिहिण्यासाठी ॲप वापरा. तुमचा एखादा पसंतीचा मार्ग असेल तर एकमेकांशी बोलून दिशानिर्देश देणे उपयुक्त ठरते.

तुम्ही तुमच्या अंतिम ठिकाणी पोहचल्यावर व वाहनातून बाहेर पडल्यावर तुमची ट्रिप संपते. तुमचे भाडे आपोआप मोजले जाते आणि तुम्ही तुमच्या Uber खात्याशी लिंक केलेल्या पेमेंट पद्धतीवर आकारले जाते.

काही शहरांमध्ये, Uber तुम्हाला कॅशमध्ये भाडे देऊ देते. हा पर्याय तुम्ही राईडची विनंती करण्याआधी निवडलेला असणे आवश्यक आहे.

ट्रिप संपल्यानंतर लगेच, ॲप तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरला 1 ते 5 स्टार्सपर्यंत रेटिंग द्यायला सांगेल. ड्रायव्हर्सनादेखील रायडर्सना रेटिंग देण्यास सांगितले जाते. Uber ची अभिप्राय सिस्टम प्रत्येकाचा आदर करणारा आणि बांधिलकी जपणारा समुदाय वाढवण्यासाठी बनवलेली आहे.

इतर मदत केंद्र विषय पाहून Uber कसे काम करते याविषयी अधिक जाणून घ्या. तुम्ही विशिष्ट प्रश्न आणि उत्तरेदेखील शोधू शकता.