बिझनेस प्रोफाइलवरून ट्रिपची विनंती करणे

तुम्ही तुमच्या कंपनीच्या बिझनेस खात्यात सामील झालात की तुम्ही बिझनेस प्रोफाइलवर राईड्सची विनंती करण्यास सज्ज आहात.

  1. ॲप उघडा.
  2. पिकअप पत्त्यात बदल करण्यासाठी “कुठे जायचे?” यावर टॅप करा (आवश्यक असल्यास) आणि तुमच्या अंतिम ठिकाणाचा पत्ता लिहा.
  3. “वाहनाचा प्रकार” निवडीच्या खालील, वैयक्तिक आणि बिझनेस प्रोफाइल यामध्ये स्विच करण्यासाठी टॉगलवर टॅप करा.
  4. वेगळे बिझनेस प्रोफाइल (तुमच्याकडे एकापेक्षा जास्त असल्यास) किंवा वेगळी पेमेंट पद्धत निवडण्यासाठी, प्रोफाइल नावाच्या शेजारील बाणावर टॅप करा.
  5. तुमच्या पिकअप लोकेशनची पुष्टी करा आणि सूचित केले गेल्यास, खर्च कोड निवडा.
  6. तुमच्या राईडची विनंती करा.

तुमच्या कंपनीला तुमच्या वैयक्तिक प्रोफाइलवरून घेतलेल्या राईड्सविषयी कोणतीही माहिती दिसणार नाही.

हे खाते कर्मचाऱ्यांनी केव्हा आणि कुठे वापरावे याबद्दल तुमच्या संस्थेचा अ‍ॅडमिन नियम आणि निर्बंध तयार करू शकतो. तुम्ही ट्रिपची विनंती करू शकत नसल्यास आणि हे चुकीचे आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया तुमच्या अ‍ॅडमिनशी संपर्क साधा.

राईडची विनंती करणे किंवा राईड प्रोफाइल्सच्या दरम्यान स्विच करणे याबद्दल अधिक माहिती हवी आहे?