बंदुक धोरण

ॲप वापरताना प्रत्येकाला Uber लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेच्या बाहेर कोणत्याही प्रकारची बंदुक बाळगण्यास प्रतिबंधित करते. यामध्ये हे समाविष्ट आहेत:

  • रायडर्स
  • रायडर्सचे पाहुणे
  • ड्रायव्हर्स
  • डिलिव्हरी व्यक्ती

कृपया लक्षात ठेवा की तुम्ही बंदुका आणि दारूगोळा वाहतूक करण्यासाठी असलेल्या वाहतूक सुरक्षा प्रशासन नियम यानुसार तुमच्या बंदुकीची वाहतूक करत असाल तरच ॲप वापरताना तुम्हाला ते बाळगण्याची परवानगी देण्यात येईल. त्याचा अर्थ असा की:

  • तुमची बंदुक अनलोड केलेली असली पाहिजे आणि टणक बाजू असलेल्या कंटेनरमध्ये लॉक करून वाहनाच्या डिकीमध्ये ठेवली पाहिजे.
  • मॅगझिन्स, क्लिप्स, दारूगोळा, बोल्ट्स व फायरिंग पिन्ससह सर्व भागांची वाहतूकदेखील वाहनाच्या डिकीमधून केली जावी.

या धोरणाचे पालन न केल्यास खाते निष्क्रिय केले जाऊ शकते.