Uber माझ्या खात्याचे संरक्षण कसे करते?

फसवणूक आणि अनधिकृत लॉगिनपासून बचाव

आमच्या सुरक्षा टीम्स अनधिकृत लॉगिन्स किंवा आर्थिक फसवणूक यासारख्या संशयास्पद ॲक्टिव्हिटीसंबंधित खात्यांचे निरीक्षण करण्यास समर्पित अशा अनेक शोध प्रणाली तयार करून त्या सक्रिय ठेवतात. उदाहरणार्थ, तुमचे Uber खाते फक्त तुम्हीच ॲक्सेस करू शकाल याची खात्री करण्यासाठी ते तुमचा फोन नंबर आणि तुमचा मोबाईल डिव्हाइस, ह्या दोन्हींशी लिंक केले गेले आहे. आपल्याला आपले खाते हॅक केले गेले असल्याची शंका आल्यास किंवा आपल्याला अनपेक्षित असे काही घडलेले दिसून आल्यास कृपया या फॉर्मचावापर करून आम्हाला कळवा.

पासवर्ड्स सुरक्षित ठेवणे

तुमचा Uber पासवर्ड आमच्या सर्व्हर्सवर मजबूत क्रिप्टोग्राफी पद्धती वापरून सुरक्षित करण्यात आलेला आहे. यामुळे तुमचा पासवर्ड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही तो वाचता येणार नाही किंवा वापरता येणार नाही.