इतरांसाठी राईड्सची विनंती कशी करावी

दुसऱ्या‍ एखाद्या व्यक्तीसाठी राईडची विनंती करण्यासाठी तुम्ही तुमचे ॲप वापरू शकता. हे करण्यासाठी:

  1. ॲपमध्ये "कुठे जायचे?" बॉक्सवर टॅप करा.
  2. स्क्रीनच्यावर "माझ्यासाठी" वर टॅप करा.
  3. "रायडर जोडा" वर टॅप करा.
  4. तुमच्या मित्रमैत्रिणीचे संपर्क तपशील भरा: एकतर संपर्क पिकरमधून त्यांची संपर्क माहिती निवडा किंवा त्यांचा मोबाइल नंबर टाइप करा.
  5. तुमचे मित्रमैत्रीण निवडलेले असल्याची खात्री करा, नंतर "पुढे" वर टॅप करा.
  6. तुमच्या मित्रमैत्रिणीची संपर्क माहिती बरोबर असल्याची खात्री करा, त्यानंतर "रायडर जोडा" वर टॅप करा.
  7. ड्रॉप-डाउन मेनूमधून इच्छित रायडर निवडा.
  8. तुमच्या मित्रमैत्रिणीचे पिकअप आणि अंतिम ठिकाण लिहा.
  9. वाहन वर्ग निवडा आणि विनंती करा.

ट्रिप स्वीकारली गेली की, तुमच्या मित्रमैत्रिणीला Uber कडून ड्रायव्हरचा अंदाजे आगमन वेळ, ड्रायव्हरचे नाव, लायसन्स प्लेट नंबर आणि वाहनाचा मेक आणि मॉडेल यासारख्या तपशीलांसह टेक्स्ट मेसेजेस मिळतील. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणीकडे Uber ॲप असण्याची गरज नाही. त्यांच्याकडे ॲप असल्यास, त्यांना Uber कडून येणाऱ्या सूचनांना अनुमती द्यावी लागेल.

एका वेळी एकापेक्षा जास्त राईड्सची विनंती करणे शक्य नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या मित्रमैत्रिणीसाठी राईडची विनंती करता, तेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी किंवा इतर कोणासाठीही नवीन राईडची विनंती करण्यापूर्वी ती ट्रिप संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.