खर्चाचे मेमोज कसे वापरावेत

Uber for Business खाते ॲडमिन्सना बिझनेस प्रोफाइलवर घेतलेल्या ट्रिप्ससाठी खर्च कोड्सची आवश्यकता असू शकते.

तुमच्या ॲडमिनला खर्च कोड्सची आवश्यकता असल्यास, राईडची विनंती करण्यापूर्वी तुम्हाला सूचीमधून एक खर्च कोड निवडण्याची किंवा तुमचा स्वत:चा खर्च कोड लिहिण्याची सूचना दिली जाईल.

तुम्हाला सूचित केले गेले नसले तरीही, तुम्हाला खर्च कोड किंवा शेरा लिहायचा असल्यास, तुम्ही राईडची विनंती केल्यानंतर तुमच्या स्क्रीनच्या तळाशी असलेल्या खर्च माहिती टॅबमध्ये ते करू शकता.

टीप: ट्रिप समाप्त होण्यापूर्वी खर्च शेरा भरणे आवश्यक आहे. ट्रिप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खर्च माहिती संपादित करू शकत नाही.

खर्च कोड्स तुमच्या मासिक स्टेटमेंटमध्ये आणि ट्रिपच्या पावत्यांमध्‍ये नमूद केले जातील. तुमच्या कंपनीच्या ॲडमिन्सनादेखील त्यांच्या डॅशबोर्डमध्ये ही माहिती ॲक्सेस करता येईल. तुमच्या ॲडमिनना तुमच्या कंपनीच्या खर्च शेरा धोरणाबद्दल विचारा.