बिझनेस राईड प्रोफाइल तयार करणे

बिझनेस राईड प्रोफाइल्सद्वारे तुम्ही राईड्सचे शुल्क तुमच्या बिझनेस क्रेडिट कार्डवर आकारू शकता आणि पावत्या तुमच्या ऑफिसच्या ईमेल पत्त्यावर प्राप्त करू शकता. तुम्ही तुमच्या कंपनीच्या बिझनेस खात्यात सामील होऊ शकता किंवा स्वतःचे बिझनेस राईड प्रोफाइल तयार करू शकता.

बिझनेस राईड प्रोफाइल तयार करण्यासाठी:

  1. Uber ॲप उघडा आणि "खाते" वर टॅप करा.
  2. “वॉलेट” वर टॅप करा, नंतर खाली स्क्रोल करून “राईड प्रोफाइल्स” वर या.
  3. “Uber for business वापरणे सुरू करा” किंवा “दुसरे बिझनेस प्रोफाइल जोडा” वर टॅप करा.
  4. तुमचे बिझनेस प्रोफाइल तयार करण्यासाठी सूचनांचे पालन करा.
  5. ऐच्छिक: पावती आपोआप फॉरवर्ड करणे चालू करण्यासाठी तुमच्या कंपनीचा खर्च प्रदाता निवडा (लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक ईमेल मिळेल). नंतर खर्च प्रदाता जोडण्यासाठी, वैयक्तिक किंवा बिझनेस राईड प्रोफाइल कसे संपादित करावे पहा.

तुम्हाला ज्या राईडचे शुल्क तुमच्या बिझनेस क्रेडिट कार्डवर आकारायचे आहे ती सुरू होण्यापूर्वी किंवा चालू असताना तुम्ही तुमची बिझनेस राईड प्रोफाइल निवडणे आवश्यक आहे.

तुमच्या कंपनीच्या बिझनेस खात्यात सामील होण्यासाठी, सूचनांकरता खालील लिंकवर टॅप करा.