टॉकबॅकच्या मदतीने ॲप मेनू नेव्हिगेट करण्यासाठी तुमचे ॲप उघडा आणि मेनू उघडण्यासाठी तुमच्या स्क्रीनच्या वर डावीकडे दोनदा टॅप करा. खालील पर्याय वरून खालपर्यंत दिसतात:
तुमच्या ट्रिप्स - या विभागामध्ये तुमच्या मागील राइड्स सूचीबद्ध असतात किंवा तुम्ही आगामी, शेड्युल केलेल्या राइड्स पाहू शकता. तुमच्या राइड इतिहासावरून स्वाइप करण्यासाठी दोन बोटे वापरा. ट्रिपसंबंधी मदतीसाठी, अभिप्राय नोंदवण्यासाठी किंवा ट्रिपची पावती पाहण्यासाठी त्यातील एक ट्रिप निवडा.
पेमेंट - या विभागामध्ये तुम्ही पेमेंट पद्धत जोडू किंवा अपडेट करू शकता
मदत - ॲपविषयी तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी लेखांमध्ये शोधा. तुम्ही या विभागातील ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांबद्दल देखील फीडबॅक देऊ शकता
मोफत राईड्स - इतरांना ॲप वापरण्यास आमंत्रित करण्याकरता या विभागामध्ये स्टोअर केलेला वैयक्तिक आमंत्रण कोड वापरा
सेटिंग्ज - ट्रिपपूर्वी किंवा त्यादरम्यान तुमचे स्थान त्वरित शेअर करण्यासाठी तुमची संपर्क माहिती अपडेट करा, घर किंवा ऑफिस यासारखी पसंतीची स्थाने सेट करा किंवा संपर्क जोडा
सहाय्यकाशी संपर्क साधा
तुमच्याकडे ॲक्सेसिबिलिटीशी संबंधित प्रश्न किंवा प्रतिसाद असल्यास, मेनूच्या "मदत" विभागामध्ये “ॲक्सेसिबिलिटी” अंतर्गत तुम्ही हे सादर करू शकता. मेनूच्या "तुमच्या ट्रिप्स" विभागामधून विशिष्ट ट्रिप निवडून ट्रिप संबंधित इतर कोणत्याही समस्या नोंदवा. त्यापुढील स्क्रीनवरील विविध पर्यायांमधून निवड करून तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकता.
This website uses third-party cookies to serve you relevant ads and provide personalisation by remembering your location. You may opt out from these cookies by selecting the "Opt out" button below. If you have an Uber account, you may opt out of the "sale" or "sharing" of your data here.