गुगल पे वापरून पेमेंट

अँड्रॉइड डिव्हायसेस असलेले रायडर्स राईड्ससाठी साइन अप करण्याकरता आणि पैसे देण्याकरता पेमेंट पद्धत म्हणून गुगल पे वापरू शकतात.

पेमेंट पद्धत म्हणून गुगल पे जोडण्यासाठी:

  1. "खाते" > “वॉलेट” > "पेमेंट पद्धत जोडा" निवडा.
  2. "गुगल पे" आणि नंतर "सुरू ठेवा" वर टॅप करा.
  3. तुमच्या ॲपमधील सूचनांचे पालन करा.

गुगल पे काढून टाकण्यासाठी:

  1. "खाते" > “वॉलेट” > "गुगल पे" निवडा.
  2. "पेमेंट पद्धत काढून टाका" आणि नंतर "हटवा" वर टॅप करा.

तुम्ही तुमची पेमेंट पद्धत ट्रिप संपल्यानंतर गुगल पेवर स्विच करू शकत नाही.