सुचवलेली पिकअप लोकेशन्स म्हणजे काय?

तुम्ही तुमच्या ट्रिपसाठी वाहन प्रकार निवडल्यानंतर, ॲप जवळपासच्या पिकअप स्पॉटची किंवा एकापेक्षा जास्त जलद पिकअप पॉइंट्सची शिफारस करू शकते. ही सुचवलेली लोकेशन्स रायडर्स आणि ड्रायव्हर्ससाठी पिकअप अधिक सुलभ आणि जलद बनवण्यासाठी आहेत. तुम्हाला ही नकाशावर निळ्या ठिपक्यांच्या स्वरूपात दिसतील.

सुचवलेला पिकअप स्पॉट किंवा जलद पिकअप पॉइंट वापरण्यासाठी, ड्रायव्हरशी जुळवले जाण्यासाठी पिकअपची पुष्टी करा वर टॅप करा.

वेगळे पिकअप लोकेशन निवडण्यासाठी, तुमच्याकडे तीन पर्याय आहेत:

  • याऐवजी दुसऱ्या‍ निळ्या ठिपक्यावर टॅप करून ते लोकेशन निवडा.
  • नकाशावरील पिन वेगळ्या पिकअप लोकेशनवर हलवा.
  • तुमच्या पिकअप लोकेशनशेजारी असलेल्या शोध चिन्हावर टॅप करा आणि वेगळे पिकअप लोकेशन लिहा.

तुम्ही तुमच्या पसंतीचा पिकअप स्पॉट सेट केल्यावर, ड्रायव्हरशी जुळवले जाण्यासाठी पिकअपची पुष्टी करा वर टॅप करा.